ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटपटू अॅन्ड्र्यू सायमंड्सचे कार अपघातात निधन झाले आहे. त्याच्या निधानचे वृत्त ऐकून क्रिकेट जगतातील दिग्गजांनी हळहळ व्यक्त केली आहे. आज गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंनीही दंडाला काळ्या फिती बांधून सायमंड्सला श्रद्धांजली वाहिली आहे.
हेही वाचा >> LSG vs RR Playing 11 : आज लखनऊ-राजस्थान आमनेसामने, कोण ठरणार सरस? जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन
आयीएलच्या पंधराव्या हंगामात आज गुजरात आणि चेन्नई यांच्यात ६२ वा सामना खेळवला जातोय. या सामन्यात चेन्नई संघाने नाणेफेक जिंकून सुरुवातीला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर गुजरात टायटन्स संघ गोलंदाजी करतोय. हे दोन्ही संघ अॅन्ड्र्यू सायमंड्सच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभाही झाले आहेत. दोन्ही संघातील खेळाडू आपल्या दंडाला काळ्या रंगाच्या फिती बांधून मैदानावर उतरले आहेत. दंडाला फीत बांधून या संघांनी सायमंड्सला श्रद्धांजली वाहिली आहे.
हेही वाचा >> अॅन्ड्र्यू सायमंड्सच्या निधनानंतर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले दु:ख, म्हणाला “आमच्या दोघांच्या…”
चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्लेइंग इलेव्हन :
ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉन्वे, मोईन अली, शिवम दुबे, एन जगदीसन, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंग, मथिशा पथिराना, मुकेश चौधरी
हेही वाचा >> शिखर धवन, हार्दिक पांड्या यांच्याकडे मोठी जबाबदारी, भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवले जाण्याची शक्यता
गुजरात टायटन्स संघाचे प्लेइंग इलव्हन :
वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल, मॅथ्यू वेड, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, अलझारी जोसेफ, यश दयाल, मोहम्मद शमी</p>