आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ५५ व्या सामन्यात चेन्नई आणि दिल्ली यांच्यात रोमहर्षक लढत झाली. या सामन्यात चेन्नईने दिल्लीला ९१ धावांनी धूळ चारत दणदणीत विजय नोंदवला. चेन्नईने दिल्लीसमोर विजयासाठी २०९ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र पूर्ण गडी बाद होईपर्यंत दिल्लीला फक्त ११७ धावा करता आल्या. या पराभवानंतर आता दिल्लीसाठी प्लेऑफपर्यंत पोहोचण्याची शर्यत आणखी कठीण होऊन बसली आहे.
हेही वाचा >>> वनिंदू हसरंगा, फॅफ डू प्लेसिसने केली कमाल; बंगळुरुचा दणदणीत विजय, हैदराबादचा लाजिरवाणा पराभव
चेन्नईने दिल्लीसमोर विजयासाठी २०९ धावांचा डोंगर उभा केला. ही धावसंख्या गाठताना दिल्लीचा एकही फलंदाज मोठी खेळी करु शकला नाही. सलामीला आलेले डेविड वॉर्नर (१९) आणि श्रीकर भारत (८) स्वस्तात बाद झाले. दुसऱ्या आणि तिसऱ्या विकेटसाठी आलेल्या मिचेल मार्श (२५) आणि ऋषभ पंत (२५) या जोडीने समाधानकारक धावा करत दिल्लीला विजयापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा >>> दिनेश कार्तिकची फलंदाजी पाहून विराट कोहली झाला थक्क, ‘डीके दादा’ला केलं थेट नमन, पाहा व्हिडीओ
मधल्या फळीतील शार्दुल ठाकुर वगळता सर्वच फलंदाजांनी निराशा केली. रोवमन पॉवेल (३), रिपाल पटेल (१), लगेच तंबुत परतले. तर शार्दुल ठाकुरने १९ चेंडूंमध्ये २४ धावा केल्या. शेवटच्या फळीतील कुलदीप यादव अनरीच नॉर्टजे (१, नाबाद) खलील अहमद (०) यांनादेखील जास्त काळासाठी मैदानावर तग धरता आली नाही. परिणामी चेन्नईचा ९१ धावांनी विजय झाला.
हेही वाचा >>> ग्लेन मॅक्सवेलची कमाल! हैदराबादच्या सलामीवीरांना पहिल्याच षटकात शून्यावर केलं बाद
यापूर्वी नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्स संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नई संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. सलामीला आलेल्या ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉन्वे या जोडीने शतकी भागिदारी केली. संघाच्या ११० धावा झालेल्या असताना अकराव्या षटकात ऋतुराज गायकवाड बाद झाला. ऋतुराजने ३३ चेंडूंमध्ये ४१ धावा केल्या.
हेही वाचा >>> दिल्ली कॅपिटल्ससमोर दुहेरी संकट,दिग्गज फलंदाज पृथ्वी शॉ पडला आजारी; केलं रुग्णालयात दाखल
त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या शिवम दुबेनेदेखील समाधानकारक खेळी केली. दुबेने १९ चेंडूमध्ये ३२ धावा केल्या. संघाच्या १६९ धावा झालेल्या असताना कॉन्वे अर्धशतकी खेळी करुन ८७ धावांवर झेलबाद झाला. त्याने सात चौकार आणि ५ षटकार लगावत ही धावसंख्या उभारली. कॉन्वे-दुबे या जोडीने ५९ धावांची भागीदारी केली.
हेही वाचा >>> राजस्थानच्या शिमरॉन हेटमायरचा मोठा निर्णय, आयपीएल सोडून परतला मायदेशी, कारण काय?
चेन्नईचे मधल्या फळीतील महेंद्रसिंह धोनी वगळता इतर फलंदाज मात्र मोठी धावसंख्या उभारू शकले नाही. तिसऱ्या विकेटसाठी आलेला अंबाती रायडू (५), मोईन अली (९), रॉबिन उथप्पा (०), हे सर्वच खेळाडू दहा धावांच्या आत बाद झाले. महेंद्रसिंह धोनीने आठ चेंडूंमध्ये दोन षटकार आणि एक चौकार लगावत २१ धावा केल्या.
हेही वाचा >>> पुन्हा भोपळा! विराट कोहली शून्यावर बाद, गोल्डन डकवर आऊट होण्याची तिसरी वेळ
चेन्नईच्या गोलंदाजांनी आपली भूमिका चोख निभावत दिल्लीच्या एकाही फलंदाजाला २५ पेक्षा जास्त धावा करु दिल्या नाही. मोईन अलीने सर्वाधिक तीन बळी घेतले. त्याने मिचेल मार्श, ऋषभ पंत आणि रिपाल पटेल या आघाडीच्या फलंदाजांना बाद केलं. मुकेश चौधरी, सिमरजित सिंह, ड्वेन ब्राव्हो या तीन गोलंदाजांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. माहिश तिक्षाणाने एक बळी घेत चेन्नईच्या विजयासाठी हातभार लावला.