IPL 2022, CSK vs KKR Live Streaming : आयपीएल क्रिकेटचा थरार आजपासून रंगाणार आहे. यावेळी आयपीएलमध्ये एकूण १० संघ खेळणार असून सर्वच सामने चुरसशीचे ठरणार आहेत. आजचा पहिला सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवला जाणार आहे. महेंद्रसिंह धोनीने चेन्नईचे कर्णधारपद रविंद्र जाडेजाकडे सोपवले असल्यामुळे जाडेजाच्या नेतृत्वातील हा सामना चेन्नई जिंकणार की श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वातील कोलकाता नाईट रायडर्स पहिला सामना जिंकून विजयी घौडदौड करणार हे पाहणे रंजक ठरेल.
यावेळी स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश
पहिला सामना कोण जिंकणार ?
कोरोना संसर्गामुळे आयपीएलचा चौदावा हंगाम प्रेक्षकांवीनाच पार पडला. यावेळी मात्र संसर्ग कमी झाल्यामुळे स्टेडियमच्या क्षमतेच्या २५ टक्के प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार आहे. स्टेडियममध्ये २५ टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत हे सामने खेळवले जाणार आहेत. त्यामुळे खेळाडूंचे मनोबल वाढणार असून सर्वच सामने अटीतटीचे होणार आहेत.
आजचा पहिला सामना कोणत्या संघांमध्ये खेळवला जाणार ?
आजचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळवला जाणार आहे.
सामना किती वाजता सुरु होणार ?
सामना रात्री ठिक ७.३० मिनिटांनी सुरु होईल.
सामना कोठे खेळवला जातोय ?
आजचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जातोय.
सामना कोठे पाहता येईल ?
आजचा सामना स्टार स्पोर्ट १, स्टार स्पोर्ट ३, स्टार गोल्ड २ तसेच सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग Disney+ Hotstar या अॅपवरदेखील पाहता येतील. तसेच सामन्याचे सर्व लाईव्ह अपडेट्स तुम्हाला loksatta.com या लोकसत्ताच्या ऑफिशियल वेबसाईटवरदेखील भेटतील.