IPL 2022, CSK vs KKR Live Score Updates : क्रिकेट चाहते मागील वर्षभरापासून ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे. आजपासून आयपीएल क्रिकेटच्या १५ व्या हंगामाला सुरुवात झाली असून या हंगामात एकूण १० संघ एकमेकांशी भिडणार आहेत. दोन संघ वाढल्यामुळे यावेळी सामन्यांची संख्यादेखील वाढवण्यात आली आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएलच्या १५ व्या हंगामाचा पहिला सामना खेळवला जात आहे. केकेआरने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. केकेआर टीम श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात चेन्नईशी दोन हात करतेय. तर धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्जचं नेतृत्व रविंद्र जाडेजा करत असून हा सामना जिंकून स्वत:ला सिद्ध करण्याचं आव्हान जाडेजापुढे आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवला जात असून क्षमतेच्या २५ टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आलीय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा