आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. या हंगामाचा पहिला सामना मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियममध्ये सुरु आहे. मात्र या पहिल्याच सामन्यात गतविजेता चेन्नई संघ म्हणावी तशी कामगिरी करु शकला नाही. मात्र महेंद्रसिंह धोनीने संघ संकटात असताना पुन्हा एकदा आपला जलवा दाखवला. त्याने ३८ चेंडूत ५० धावा करुन केकेआरला अक्षरश: घाम फोडला. धोनीच्या धडाकेबाज खेळाच्या जोरावरच चेन्नई संघ १३१ धावा करु शकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मागील हंगामात ऑरेंज कॅप मिळवणारा ऋतुराज गायकवाड पहिल्याच षटकात शून्यावर बाद झाला. त्यानंतर चेन्नईचा कोणताही फलंजाद मैदानावर जास्त वेळ तग धरू शकला नाही. ऋतुराजनंतर ड्वेन ब्रव्होच्या रुपात चेन्नईला २८ धावांवर दुसरा झटका बसला. त्यानंतर रॉबिन उथप्पाने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र मैदानावर लय सापडण्याआधीच उथप्पाला वरुण चक्रवर्तीने २८ धावांवर बाद केले. त्यानंतर ६१ धावा होईपर्यंत चेन्नईचे पाच गडी बाद झाले. अंबाती रायडू १५ धावांवर बाद झाला. तर शिवम दुबे अवघा ३ धावा करुन तंबूत परतला.

त्यानंतर मात्र रविंद्र जाडेजा आणि महेंद्रसिंह धोनीने चांगला खेळ करत संघाला सावरलं. धोनीने मोठे फटके लगावत ३८ चेंडूंमध्ये ७ चौकार तर एका षटकाराच्या जोरावर ५० धावा केल्या. तर रविंद्र जाडेजाने २८ चेंडूंमध्ये २६ धावा करत धोनीला साथ दिली. या दोघांनी ७० धावांची भागिदारी करत संघाला संघाचा धावफलक १३१ धावापर्यंत पोहोचवला.

दरम्यान, धोनीने चेन्नईचे कर्णधारपद नुकतेच सोडले आहे. कर्णधारपद नसल्यामुळे धोनी कोणत्याही दडपणाखाली न येता खेळेल असा अंदाज बांधला जात होता. हा अंदाज खरा ठरला असून अवघ्या ६१ धावांवर पाच गडी बाद झालेले असताना धोनीने अर्धशतक करुन केकेआरसमोर १३१ धावांचे आव्हान उभे केले.