आयपीएलच्या पंधाराव्या हंगामाला सुरुवात झाली असून पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जला पराभूत केलंय. चेन्नईने दिलेलं १३२ धावांचं लक्ष्य केकेआरने लिलया पेलत सामना खिशात घातला. केकेआरच्या या विजयासाठी अजिंक्य रहाणे, सॅम बिलिंग्स यांनी मोलाची कामगिरी केली असून गतविजेत्या चेन्नईला यावेळी केकेआरने पहिल्याच सामन्यात धूळ चारली आहे.

बिलिंग्स, राणा आणि अय्यरच्या खेळामुळे विजय सोपा

Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Indian Women On Course For Clean Sweep Against West Indies
भारताचे निर्भेळ यशाचे लक्ष्य; वेस्ट इंडिज महिला संघाविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना आज
PAK vs SA Corbin Bosch takes wicket on first ball of Test career to create new record
PAK vs SA: पदार्पणाच्या कसोटीत आफ्रिकेच्या खेळाडूने पहिल्याच चेंडूवर केला मोठा विक्रम, १३५ वर्षांत पहिल्यांदाच घडलं असं काही
Jasprit Bumrah Bowled Out Travis Head on Duck and Breaks Anil Kumble Record of Most Wickets At MCG IND vs AUS
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा तारणहार हेड असा झाला त्रिफळाचीत; जसप्रीत बुमराहने नावावर केला अनोखा विक्रम, पाहा VIDEO
Sam Konstas hit six against Jasprit Bumrah after 4483 balls in IND vs AUS Boxing Day Test at Melbourne match
IND vs AUS : सॅम कॉन्स्टासने जसप्रीत बुमराहविरुद्ध षटकार लगावत लावली विक्रमांची रांग! पाहा संपूर्ण यादी
IND vs AUS Boxing Day Test Sam Konstas hit six against Jasprit Bumrah after 4483 balls
IND vs AUS : १९ वर्षीय खेळाडूने जसप्रीत बुमराहविरुद्ध केला मोठा पराक्रम, ११४५ दिवसांनी मोडला खास विक्रम
IND vs AUS Boxing Day Test Virat Kohli and Sam Konstas argument video viral
IND vs AUS : विराट आणि सॅम कॉन्स्टास यांच्यात झाली धक्काबुक्की! पंचांसह ख्वाजाला करावी लागली मध्यस्थी, पाहा VIDEO

नाणेफेक जिंकल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आलेले चेन्नईचे खेळाडू मैदानावर जास्त काळ तग धरू शकले नाहीत. चेन्नईने वीस षटकांत १३१ धावांचे लक्ष्य केकेआरसमोर ठेवले. हे आव्हान स्वीकारत केकेआरच्या खेळाडूंनी चांगला खेळ केला. केकेआरच्या अजिंक्य रहाणेने ३४ चेंडूंमध्ये ६ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४४ धावा केल्या. त्यानंतर व्यंकटेश अय्यरने १६ चेंडूंमध्ये १६ धावा करत संघाला विजयाची वाट सुकर करुन दिली. सॅम बिलिंग्सने २२ चेंडूंमध्ये २५ धावा तर नितीश राणाने १७ चेंडूंमध्ये २१ धावा केल्या. बिलिंग्स, राणा आणि अय्यरच्या या खेळामुळे केकेआरला विजय सोपा झाला.

पहिल्या फळीतील फलंदाजांची निराशाजनक कामगिरी

तर याआधी फलंदाजीसाठी उतरलेला गतविजेता चेन्नई संघ म्हणावी तशी कामगिरी करु शकला नाही. चेन्नईच्या पहिल्या फळीतील फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. ऑरेंज कॅप मिळवणारा ऋतुराज गायकवाड पहिल्याच षटकात शून्यावर बाद झाला. त्यानंतर चेन्नईचा कोणताही फलंजाद मैदानावर जास्त वेळ तग धरू शकला नाही. ऋतुराजनंतर डेव्हॉन कॉन्वेच्या रुपात चेन्नईला २८ धावांवर दुसरा झटका बसला. त्यानंतर रॉबिन उथप्पाने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र लय सापडण्याआधीच उथप्पाला वरुण चक्रवर्तीने २८ धावांवर बाद केले. त्यानंतर ६१ धावा होईपर्यंत चेन्नईचे पाच गडी बाद झाले. अंबाती रायडू १५ धावांवर बाद झाला. तर शिवम दुबे अवघा ३ धावा करुन तंबुत परतला. मात्र महेंद्रसिंह धोनी आणि रविंद्र जाडेजा या जोडीने संघाला सावरत केकेआरसमोर १३२ धावांचे आव्हान उभे केले.

धोनीने चेन्नईला सावरलं पण अखेर पराभव

रविंद्र जाडेजा आणि महेंद्रसिंह धोनीने चांगला खेळ करत संघाला सावरलं. धोनीने मोठे फटके लगावत ३८ चेंडूंमध्ये आपले अर्धशकत पूर्ण केले. तर रविंद्र जाडेजाने धोनीला साथ धेत २८ चेंडूंमध्ये २६ धावा केल्या. या दोघांनी ७० धावांची भागिदारी करत संघाचा धावफलक १३१ धावापर्यंत नेऊन पोहोचवला. मात्र १३१ धावांचे लक्ष्य केकेआरने लिलया पेलत सहा गडी राखून चेन्नईचा पराभव केला.

Story img Loader