आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सातवा सामना चांगलाच रोमहर्षक झाला. चेन्नई आणि लखनऊ यांच्यात रंगलेल्या या समान्यात आश्चर्यकारक पद्धतीने लखनऊने दणदणीत विजय मिळवला. चेन्नईने ठेवलेले २१० धावांचे लक्ष्य लखनऊने सहा गडी आणि तीन चेंडू राखून गाठले. लखनऊच्या या विजयासाठी क्विंटन डी कॉक तसेच के एल राहुल यांनी मोठी मेहनत घेतली. तर डी कॉक आणि राहुल यांच्या प्रयत्नांना पुढे नेत लुईसने नाबाद ५५ धावांचा खेळ करत लखनऊला विजय मिळवून दिला.

क्विंटन डी कॉकने केलं मोठं काम

चेन्नईने दिलेल्या २११ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी लखनऊचा कर्णधार केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक सलामीला उतरले. या जोडीने मैदानावर चांगल्या प्रकारे पाय रोवले होते. चेन्नईला ही जोडी तोडण्यासाठी चांगलीच मेहनत घ्यावी लागली. ही जोडी शतकी भागिदारी करणार असे वाटत असताना प्रिटोरीयसच्या चेंडूवर राहुल झेलबाद झाला. त्यानंतर राहुल बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी मनिष पांडे मैदानात उतरला. मात्र तो चांगला खेळ करु शकला नाही. सहा चेंडूंमध्ये पाच धावा करत पांडे तुषार देशपांडेने टाकलेल्या चेंडूवर झेलबाद झाला. डीजे ब्राव्हेने त्याचा झेल टिपला.

मनिष पांडे बाद होताच एव्हिन लुईस मैदानात उतरला. तर दुसरीकडे क्विंटन डी कॉकनेही मैदानावर चांगला जम बसवला होता. मात्र संघाच्या १३९ धावा असताना डी कॉक प्रिटोरियसने टाकलेल्या चेंडूवर ६१ धावांवर झेलबाद झाला. डी कॉकने ४५ चेंडूंमध्ये ९ चौकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या.

लुईस लखनऊला विजयापर्यंत घेऊन गेला

शेवटी लुईस आणि आयुष बदोनी यांनी संघाला सावरत अशक्य वाटत असलेले काम करुन दाखवले. शेवटच्या षटकात सात धावांचे लक्ष्य बदोनीने असताना पहिल्याच चेंडूमध्ये जोराचा षटकार लगावला. त्यानंतर पाच चेंडूमध्ये एक धाव करावयची असल्यामुळे सामना लखनऊच्या बाजूने झुकला. त्यानंतर षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर आयुषने जोराचा फटका मारत धाव घेतली. परिणामी लखनऊने सहा गडी आणि तीन चेंडू राखून विजय नोंदवला.

ऋतुराजकडून निराशा, उथप्पाने केली धडाकेबाज फलंदाजी

याआधी लखनऊ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतल्यामुळे फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईने पहिल्या सामन्याच्या तुलनेत चांगली कामिगिरी केली. सलामीला आलेल्या रॉबिन उथप्पाने २७ चेंडूमध्ये आठ चौकार आणि एक षटकार यांच्या मदतीने ५० धावा केल्या. रॉबिनच्या या धावांची चेन्नईला २०० पेक्षा जास्त धावा करण्यास मोठी मदत झाली. मात्र उथप्पासोबत सलामीला आलेल्या ऋतुराजने पुन्हा एकदा निराशा केली. या सामन्यात तो फक्त एकच धावा करु शकला. त्यानंतर चेन्नईकडून पहिलाच सामना खेळणाऱ्या मोईन अलीने संघाला काही प्रमाणात सावरण्याचे काम केले.

मधल्या फळीतील खेळाडूंकडून साधारण कामगिरी

मोईन अलीने २२ चेंडूंमध्ये चार चौकार आणि दोन षटकार यांच्या मदतीने ३५ धावा केल्या. मात्र आवेश खानने टाकलेल्या चेंडूवर त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर शिवम दुबेने उल्लेखनीय कामगिरी केली. त्याने ३० चेंडूंमध्ये पाच चौकार आणि दोन षटकार यांच्या जोरावर ४९ धावा केल्या. नंतर मात्र एकही फलंदाजाने उल्लेखनीय खेळ केला नाही. अंबाती राडडू (२७), रविंद्र जाडेजा (१७), धावा केल्या. तर सातव्या क्रमांकावर उतरलेल्या धोनीने फक्त सहा चेंडू खेळले. मात्र या सहा चेंडूंच्या मदतीने त्याने दोन चौकार आणि एक षटकार लगावत १६ धावा केला. धोनी तसेच ब्राव्हो नाबाद राहिले. शेवटी वीस षटकांमध्ये चेन्नईने २१० धावांचे लक्ष्य लखनऊसमोर ठेवले होते.

Story img Loader