आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील २२ वा सामना चांगलाच रोमांचक झाला. बंगळुरु आणि चेन्नई यांच्यातील सामन्यात चौकार आणि षटकारांचा अक्षरश: पाऊस पडला. फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईने धमाकेदार खेळ करत धावफलक २०० च्या पार नेऊन ठेवलाय. रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबे या जोडीने धडाकेबाज खेळी केल्यामुळे चेन्नईला २१६ धावा करणे शक्य झाले आहे. रॉबिन उथप्पाने ८८ तर शिवम दुबेने ९५ धावांची खेळी केली आहे.
हेही वाचा >>>CSK vs RCB : चेन्नई-बंगळुरु यांच्यात लढत, आरसीबीच्या खेळाडूंनी दंडाला बांधल्या काळ्या फिती, नेमकं कारण काय?
बंगळुरुने नाणेफेक जिंकल्यानंतर चेन्नईची ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पा ही जोडी सलामीला आली. मात्र चौथ्याच षटकात ऋतुराज गायकवाड पायचित झाला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेला मोईन अली देखील फक्त तीन धावा करु शकला. त्यानंतर मात्र रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबे या जोडीने बंगळुरुच्या गोलंदाजांना सळो की पळो करुन टाकले. रॉबिन उथप्पाने फक्त ५० चेंडूंमध्ये चार चौकार आणि ९ षटकार लगावत तब्बल ८८ धावा केल्या. तर शिवम दुबेने फक्त ४६ चेंडूंमध्ये पाच चौकार आणि आठ षटकार लगावत ९५ धावा केल्या.या जोडीने १६५ धावांची भागिदारी केली.
हेही वाचा >>> अक्षर पटेलच्या नावामध्ये निघाली चूक, फिरकीपटूने सांगितला पासपोर्टचा ‘तो’ भन्नाट किस्सा
हेही वाचा >>> माजी क्रिकेटपटूचे श्रीलंकन खेळाडूंना IPL सोडण्याचे आवाहन, म्हणाले “तिकडे…”
उथप्पाला मिळालं जीवदान
मैदानावर जम बसल्यानंतर रॉबिन उथप्पाला एकदा जीवदान मिळालं. 81 धावांवर असताना मोहम्मद सिराजने टाकलेल्या चेंडूवर त्याचा झेल टिपण्यात आला. मात्र नो बॉल असल्यामुळे उथप्पाला जीवदान मिळाले. त्यानंतर उथप्पाने ८८ धावा केल्या.
चेन्नईच्या उथप्पा आणि शिवम दुबे या जोडीने बंगळुरुच्या गोलंदाजांची पिसं काढली. आकाश दीपने टाकलेल्या चार षटकात चेन्नईने ५८ धावा केल्या. आकाश दीपला एकही बळी घेता आला नाही. त्यानंतर मोहम्मद सिराजने ३७ तर सोश हेझलवूडने ३३ धावा दिल्या. वनिंदू हसरंगाने दोन विकेट घेत ३५ धावा दिल्या.