आयपीएलच्या पंधारव्या हंगामातील १७ व्या सामन्यात चेन्नईला पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले असून सनरायझर्स हैदराबादने आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. अभिषेक शर्माने दमदार फलंदाजी केल्यामुळे हैदराबादसाठी हा विजय सोपा झाला. शर्माने ७५ धावा केल्यामुळे चेन्नईने दिलेले १५४ धावांचे आव्हान हैदराबाद संघ सहज गाठू शकला. हैदरबादाचा या हंगामातील हा पहिला विजय असून चेन्नई सुपर किंग्जला सलग चौथ्या सामन्यातदेखील पराभवाचा सामना करावा लागला आहे.

चेन्नई सुपर किंग्जने दिलेल्या १५४ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी हैदराबादच्या संघाला जास्त मेहनत घ्यावी लागली नाही. हे लक्ष्य गाठण्यासाठी अभिषेक शर्मा आणि केन विल्यम्सन ही जोडी सलामीला फलंदाजीसाठी उतरली. या जोडीने धमाकेदार खेळ करत पहिल्या विकेटसाठी ८९ धावांचा खेळ केला. १३ व्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवर विल्यम्सन मुकेश चौधरीच्या चेंडूचा सामना करताना झेलबाद झाला. विल्यम्सनने ४० चेंडूंमध्ये ३२ धावा केल्या. आपल्या खेळीमध्ये त्याने एक षटकार तर दोन चौकार लगावले.

हेही वाचा >>> IPL 2022, RCB vs MI Live Update : आज मुंबई- बंगळुरु आमनेसामने, आरसीबीचा गोलंदाजी करण्याचा निर्णय

तर सलामीला आलेल्या अभिषेक शर्माने नेत्रदीपक फलंदाजी करत ५० चेंडूंमध्ये ३ षटकार आणि ५ चौकार लगावत ७५ धावा केल्या. दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या राहुल त्रिपाठीने विल्यम्सला चांगली साथ दिली. त्याने १५ चेंडूंमध्ये ५ चौकार तर २ षटकार लगावत ३९ धावा केल्या. तर अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी निकोलस पूरन फलंदाजीसाठी आला. शेवटी हैदराबादने आठ गडी राखून चेन्नईवर विजय मिळवला. तर शेवटी राहुल त्रिपाटी (३९), निकोलस पूरन (५) नाबाद राहिले.

हेही वाचा >>> Video : मुंबई-बंगळुरु सामन्यापूर्वी विराटला संताप अनावर, सराव करताना बॅटवर काढला राग, नेमकं काय घडलं ?

नाणेफेक जिंकनू सनरायझर्स हैदराबादने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चेन्नईकडून रॉबिन उथप्पा आणि ऋतुराज गायकवाड सलामीला आले. मात्र हे दोघेही चांगली कामगिरी करु शकले नाही. उथप्पाने अकरा तर ऋतुराजने सोळा धावा केल्या. दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या मोई अलीने मात्र चांगली खेळी केली. त्याने १३ चेंडूंमध्ये तीन चौकार आणि दोन षटकार यांच्या मदतीने ४८ धावा केल्या. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी आलेल्या अंबाती रायडूने २७ केल्या. तो वॉशिंग्टन सुंदरच्या चेंडूवर झेलबाद झाला.

हेही वाचा >>> Video | चेन्नईच्या ऋतुराज गायकवाडवर हैदराबादचा नटराजन पडला भारी, पहिल्याच चेंडूवर उडवला त्रिफळा

त्यानंतर चौथ्या विकेटसाठी आलेला शिवम दुबे फक्त तीन धावा करु शकला. तोही टी नटराजनच्या चेंडूवर झेलबाद झाला. रविंद्र जाडेजाने २३ धावा करुन संघाला १५४ धावांपर्यंत जाण्यासाठी मदत केली. धोनी अवघ्या तीन धावा करुन शकला. तो मार्को जानसेनच्या चेंडूवर झेलबाद झाला. तर डीजे ब्राव्हो (३), ख्रिस जॉर्डन (६) नाबाद राहिले. वीस षटकांत चेन्नईने १५४ धावसंख्या उभारली.

हेही वाचा >>> १५ व्या मजल्याच्या बाल्कनीत लटकत ठेवल्याचा चहलचा अनुभव ऐकताच सेहवागची मोठी मागणी, म्हणाला, “हे खरं असेल तर…”

तर दुसरीकडे गोलंदाजी विभागात हैदराबादच्या गोलंदाजांनी आपले काम चोख बजावत चेन्नईला अवघ्या १५४ धावांपर्यंत रोखून धऱले. वाॉशिंग्टन सुंदर, टी नरटाजनने प्रत्येकी दोन फलंदाजांना बाद केलं. तर चार षटकातं अनुक्रमे २१ आणि ३० धावा दिल्या. तर भुवनेश्वर कुमारने, मार्को जानसेन, मर्कराम यांनी एक- एक गड्याला बाद केले. त्यांनी प्रत्येकी ३६, ३०, ८ धावा दिल्या.

हेही वाचा >>> “लोक तुला मारून टाकतील, मुंबईत येऊन सचिनला बाद करायला तुला…”, शोएब अख्तरने सांगितला आयपीएलचा ‘तो’ किस्सा

तर दुसरीकडे चेन्नईच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारतान न आल्यामुळे गोलंदाजांना हैदराबादला रोखणे जिकरीचे होऊन बसले. चेन्नईचा मुकेश चौधरी, डिजे ब्राव्हो वगळता एकही गोलंदाजाला यश मिळाले नाही. चौधरीने केन विल्यम्सनचा बळी घेत चार षठकांत ३० धावा दिल्या. तर ख्रिस जॉर्डन, रविंद्र जाडेजा, मोईन अली यांना हैदराबाच्या एकाही फलंदाजाला बाद करता आलं नाही.

Story img Loader