आयपीएलच्या पंधराव्या हंगामात दोन आगावीचे संघ सामील झाल्यामुळे एकूण दहा संघांमध्ये अटीतटीच्या लढती होत आहेत. शनिवारी दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झालेली लढत तर चांगलीच रोमहर्षक ठरली. या सामन्यात गुजरातने दिल्लीला १४ धावांनी पराभूत केलं. दरम्यान या सामन्याच्या नाणेफेकीदरम्याचा एक मजेदार व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. नाणेफेकीदरम्यान दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत चांगलाच गोंधळला.
नाणेफेक करताना नेमकं काय घडलं ?
दिल्ली आणि गुजरात यांच्यातील सामन्याला शनिवारी रात्री ७.३० वाजता सुरुवात झाली. याआधी दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकली. त्यानंतर समालोचक डॅरी मॉरिसन यांनी ऋषभ पंतला तुझ्या संघाला फलंदाजी करायची आहे की गोलंदाजी असं विचारलं. या प्रश्नाला उत्तर देताना मात्र ऋषभ पंत चांगलाच गोंधळला. अगोदार आम्हाला गोलंदाजी करायची आहे, असे पंत म्हणाला. मात्र लगेच त्याने आपला निर्णय बदलत आम्हाला गोलंदाजी करायची आहे असं सांगितलं.
या सर्व गोंधळानंतर गुजरात टायटन्सचा हार्दिक पांड्या आणि दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत यांच्यात चांगलाच हशा पिकला. तर ऋषभ गोंधळल्यानंतर पंचाने पुन्हा एकदा तुझ्या संघाला खरच गोलंदाजी करायची आहे का, असं विचारल. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. दरम्यान नाणेफेक जिंकलेली असली तरी दिल्लीने हा सामना १४ धावांनी गमावला.