आयपीएलच्या १५ व्या हंगामातील सर्वच सामने अटीतटीचे होत आहेत. आज झालेल्या १९ व्या सामन्यात केकेआर आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांमध्ये लढत झाली. या सामन्यात सुरुवातीपासून तुफान फटकेबाजी करत २१६ धावांचे आव्हान उभे केलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा ४४ धावांनी विजय झाला. तर दुसरीकडे २१६ धावांचे लक्ष्य गाठत असताना केकेआरची चांगलीच दमछाक झाली. कोलकाता संघ पूर्ण गडी बाद होईपर्यंयत फक्त १७१ धावा करु शकला. दिल्लीच्या विजयासाठी कुलदीप यादवने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने चार बळी घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>केकेआरच्या गोलंदाजांनी हात टेकले, पॉवरफुल वॉर्नरची तुफान फटकेबाजी, अर्धशतक झळकावून रचला ‘हा’ नवा विक्रम

दिल्लीने दिलेले २१६ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या कोलकाता संघातील श्रेयस अय्यर वगळता एकही फलंदाज चांगला खेळ करु शकला नाही. सलामीला आलेल्या अजिंक्य रहाणेला पंचाच्या चुकीमुळे जीवदान मिळूनही तो अवघ्या आठ धावांवर झेलबाद झाला. तर व्यंकटेश अय्यरदेखील आपली जादू दाखवू शकला नाही. त्याने आठ चेंडूंमध्ये १८ धावा केल्या. व्यंकटेश अय्यर झेलबाद झाल्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या श्रेयस अय्यरने मात्र धडाकेबाज अर्धशतकी खेळी केली. त्याने ३३ चेंडूंमध्ये पाच चौकार आणि दोन षटकार यांच्या मदतीने ५४ धावा केल्या.

हेही वाचा >> चुकीच्या पद्धतीने बाद दिल्यामुळे विराट संतापला, आरसीबीने तर सांगितला थेट नियम, MI vs RCB सामन्यात पंचाची पुन्हा चूक?

नितीश राणा आणि श्रेयस अय्यर या जोडीने संघाला काही प्रमाणात सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र संघ १०७ धावांवर असताना नितीश राणा ३० धावांवर बाद झाला आणि कोलकाता संघ उतरणीला लागला. आंद्रे रसेल फक्त दहा धावा करु शकला. तर सॅम बिलिंग्सने १५ धावा केल्या. पॅट कमिन्स चार धावांवर पायचित झाला. तर सुनिल नरेन कुलदीप यादवच्या चेंडूचा सामना करताना चार धावांवर झेलबाद झाला.

हेही वाचा >> IPL 2022 : बंगळुरुचा दिग्गज खेळाडू आयपीएलमधून पडला बाहेर, तातडीने गाठलं घर, नेमकं कारण काय ?

उमेश यादव खांतदेखील खोलू शकला नाही. संघाचे आठ गडी बाद झालेले असताना आंद्रे रसेलने लढा दिला. मात्र चेंडू शिल्लक न राहिल्यामुळे मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करताना तो २४ धावांवर झेलबाद झाला. तर शेवटच्या षटकात रसिख सलमान सात धावांवर झेलबाद झाला. शेवटी पूर्ण संघ बाद झाल्यामळे दिल्लीने हा सामना ४४ धावांच्या फरकाने खिशात घातला.

हेही वाचा >> IPL 2022, RCB vs MI : मुंबईचा सूर्यकुमार तळपला, चाहते म्हणतात ‘एकच वादा सूर्या दादा,’ मैदानातील पोस्टर्स व्हायरल

याआधी नाणेफेक जिंकून केकेआरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय केला. त्यानंतर पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नर ही जोडी दिल्लीकडून फलंदाजीसाठी मैदानात उतरली. या जोडीने चांगला खेळ करत ९३ धावांची भागिदारी केली. मात्र नवव्या षटकात पृथ्वी शॉ वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर ५१ धावांची अर्धशतकी खेळी करुन बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या ऋषभ पंतने मोठे फटके लगावत दोन चौकार आणि दोन षटकार यांच्या मदतीने १४ चेंडूंमध्य २७ धावा केल्या. दिल्ली संघ १४८ धावांवर असताना ऋषभ पंत २६ धावांवर बाद झाला.

हेही वाचा >> Video | चेन्नईच्या ऋतुराज गायकवाडवर हैदराबादचा नटराजन पडला भारी, पहिल्याच चेंडूवर उडवला त्रिफळा

त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी आलेला ललित यादव मैदानावर टीकू शकला नाही. फक्त एक धाव करून तो पायचित झाला. ललित बाद झाल्यानंतर आलेला रोवमन पॉवेलदेखील फक्त आठ धावा करु शकला. त्यानंतर मात्र अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर ही जोडी प्रत्येकी २२ आणि २९ धावा करुन संघाला २१५ धावांपर्यंत घेऊन घेली. दरम्यान, सलामीला आलेल्या डेविड वॉर्नरने मात्र नेत्रदीपक कामगिरी करुन ४५ चेंडूंमध्ये ६१ धावा केल्या. आपल्या खेळीमध्ये त्याने सहा चौकार आणि दोन षटकार लगावले. ६१ धावांवर असताना उमेश यादवच्या चेंडूवर तो झेलबाद झाला.

हेही वाचा >> मद्यप्राशन केलेल्या संघ-सहकाऱ्याकडून गैरवर्तन!; २०१३च्या ‘आयपीएल’मधील अनुभवाचा चहलकडून गौप्यस्फोट

दुसरीकडे केकआरचे फलंदाज आज आपला करिष्मा दाखवू शकले नाहीत. सलामीला आलेल्या पृथ्वी शॉ आणि वॉर्नर या जोडीला तोडण्यासाठी केकआरच्या फलंदाजांना नवव्या षटकापर्यंत वाट पाहावी लागली. उमेश यादवने चार षटकांत ४८ धावा देत एक बळी घेतला. तर सुनिल नरेनने चार षटकांत २१ धावा देत दोन बळी घेतले. वरुण चक्रवर्ती आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी एक-एक बळी घेतला.

तर दिल्लीच्या गोलंदाजांनी कोलकाताच्या फलंदाजांना रोखून धरण्यात यश मिळवले. खलिल अहमदने व्यंकटेश अय्यर आणि अजिंक्य रहाणे या सलामीच्या जोडीला तंबुत पाठवून दिल्लीचा विजय सुकर केला. अहमदने एकूण तीन गड्यांना बाद केले. तर कुलदीप यादवने चमकदार कामगिरी करुन चार षटकांत ३५ धावा देत चार बळी घेतले. ललित यादवने एक बळी घेतला.