आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सर्वच सामने रोमहर्षक आणि अटीतटीचे होत आहेत. यातील काही सामने तर चांगलेच संस्मरणीय ठरत आहेत. आयपीएल म्हटलं की चौकार आणि षटकार यांचा अक्षरश: पाऊस पाहायला मिळतो. या स्पर्धेमधील वीस-वीस षटकांच्या सामन्यात खेळाडू अनेक विक्रम करतात. मात्र थरारक सामन्यांसोबतच आयपीएलमध्ये ग्लॅमरचाही तडकाही पाहायला मिळतो. प्रेक्षक गॅलरीमध्ये बसलेल्या सुंदरी कॅमेऱ्यामध्ये हमखास झळकतात. सध्या तर १० एप्रिल रोजी झालेल्या दिल्ली आणि कोलकाता यांच्यातील सामन्यामध्ये एका मिस्ट्री गर्लची चांगलीच चर्चा सुरु आहे. सामना सुरु असताना कॅमेरामॅनने या तरुणीचे हावभाव टिपल्यामुळे ती क्षणात व्हायरल झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> अश्विनसोबत जे झालं ते कधीच घडलं नाही, आयपीएलच्या इतिहासात RR vs LSG सामन्यामध्ये पहिल्यांदाच रिटायर्ड आऊट

हेही वाचा >>> आयपीएलमध्ये पंचांकडून चुकांवर चुका, DC vs KKR सामन्यात खेळाडू वैतागले, नेमकं काय घडलं?

ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात व्हायरल झालेल्या मिस्ट्री गर्लचं नाव आरती बेदी असं आहे. सामना सुरु असताना तिला कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं होतं. कोलकाता संघाचा फलंदाज अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर या तरुणीचे हावभाव पाहण्यासारखे होते. याच कारणामुळे ती कोलकाता नाईट रायडर्स संघाची चाहती असल्याचा अंदाज लावला जातोय.

हेही वाचा >>> कुलदीप यादव रॉक्स ! ४४ धावांनी दिल्लीचा दणदणीत विजय, २१६ धावांचे लक्ष्य गाठताना केकेआरची दमछाक

विशेष म्हणजे व्हायरल झाल्यानंतर या तरुणीला नेटकऱ्यांनी शोधून काढलं असून आरती बेदी ही एक अभिनेत्री असल्याचे समोर आले आहे. तिने यापूर्वी प्रसिद्ध कंपन्यांच्या वेगवेगळ्या उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये काम केलं आहे. दरम्यान व्हायरल झालेली आरती बेदी केकेआरची चाहती असली तरी केकेआरला हा सामना गमावावा लागला. दिल्लीने उभे केलेले २१५ धावांचे लक्ष्य गाठताना केकेआरची दमछाक झाली. केकेआरचा पूर्ण संघ अवघ्या १७१ धावांवर बाद झाला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 dc vs kkr mystery girl aarti bedi photos went viral on social media prd