IPL 2022 DC vs KKR Playing XI : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ४१ व्या सामन्यात आज दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात लढत होईल. दोन्ही संघ तूल्यबळ असल्यामुळे आजच्या सामन्यात कोणाची सरशी होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आज संध्याकाळी ७.३० वाजता वानखेडे स्टेडियमवर या सामन्यास सुरुवात होईल.

हेही वाचा >> मॅक्सवेलच्या लग्नाच्या पार्टीत विराट कोहलीने केला जबरदस्त डान्स, व्हिडीओ सोशल मीडियावर viral

ऋषभ पंत नेतृत्व करत असलेला दिल्ली कॅपिटल्स हा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. या संघाने एकूण सात सामने खेळलेले असून यापैकी तीन सामन्यांत या संघाचा विजय तर चार सामन्यांत पराभव झालेला आहे. तर कोलकाता संघ गुणतालिकेत आठव्या स्थानी असून या संघाने एकूण आठ सामने खेळले आहेत. यापैकी तीन सामन्यांमध्ये विजय तर पाच सामन्यांमध्ये कोलकाताचा पराभव झालेला आहे. त्यामुळे आजचा सामना हा दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. आजचा सामना जिंकूण गुणतालिकेत वरचे स्थान गाठण्यासाठी हे दोन्ही संघ पूर्ण ताकतीने प्रयत्न करतील.

हेही वाचा >> SRH vs GT : उमरान मलिकच्या ‘रफ्तार’पुढे गुजरात संघ गारद, पठ्ठ्याने एकट्याने घेतल्या पाच विकेट्स

याआधीच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने तीन मोठे बदल केले होते. टीम साऊदी, सॅम बिलिंग्ज, रिंकू सिंग यांचा समावेश केला होता. त्यामुळे हे तिन्ही खेळाडू आजच्या सामन्यातही कायम राहणार का हे पाहावे लागणार आहे. कोलकताच्या श्रेयस अय्यरला आता आपल्या खेळात सातत्य ठेवावे लागणार आहे. या हंगामात आंद्रे रसेल चांगली खेळी करत आहे. त्यामुळे त्याच्या खेळीवरही कोलकाताचा विजय अवलंबून असेल. आंद्रे रसेलने आतापर्यंतच्या सात सामन्यांत २२७ धावा केल्या आहेत.

हेही वाचा >> तेवतिया-राशिद खाननं करून दाखवलं; शेवटच्या चेंडूवर गुजरातचा हैदराबादवर चित्तथरारक विजय

तर दिल्ली कॅपिटल्स संघाबाबत विचार करायचा झाला तर दिल्लीचा पृथ्वी शॉदेखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पृथ्वी शॉच्या जोडीला डेविड वॉर्नरही असल्यामुळे हे दोन्ही खेळाडू कोलकातासाठी डोकेदुखी ठरू शकतात. पृथ्वी शॉने आतापर्यंत सात सामन्यांमध्ये २५४ धावा केल्या आहेत. ऋषभ पंतच्या खेळाकडेही आजच्या सामन्यात सर्वांचे लक्ष्य असेल. राजस्थानसोबतच्या खेळात तो चांगली कामगिरी करु शकलेला नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात तो काय जादू दाखवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा >> ४, २, १, ६, ६, ६! हैदरबादचा शशांक तळपला, फक्त सहा चेंडूंमध्ये केल्या २५ धावा

दिल्ली कॅपिटल्स संघाचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन

पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, सरफराज खान, ऋषभ पंत (कर्णधार), रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, खलील अहमद

हेही वाचा >> Video : मोहम्मद शमीच्या चेंडूवर हैदराबादचा कॅप्टन क्लीन बोल्ड, परफेक्ट गोलंदाजीचा व्हिडीओ पाहाच

कोलकाता नाइट रायडर्सचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन

व्यंकटेश अय्यर, सुनील नरेन, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, सॅम बिलिंग्ज, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, टीम साऊदी, शिवम मावी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती

Story img Loader