IPL 2022, DC vs MI Highlights :आयपीएलच्या १५ व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यामध्ये केकेआरने चेन्नईला पराभूत केलं आहे. आज साडेतीन वाजता आयपीएलच्या इतिहासातील सर्वात शक्तीशाली मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आजचा सामना सुरु आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिट्लस या दोन बलशाली संघांमध्ये हा सामना खेळला जात आहे. मुंबईने आपयीएलच्या इतिहासात आतापर्यंत पाच वेळा जेतेपद पटकावले असून मुंबईचे नेतृत्व रोहित शर्मा करतोय. तर दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व ऋषभ पंत करत आहे. ब्रेबॉन स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे.

Live Updates
19:19 (IST) 27 Mar 2022
दिल्लीने चारली मुंबईला धूळ, चार विकेट राखून दिल्लीचा विजय

दिल्ली कॅपिटल्सने चार गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. दिलेले १७७ धावांचे लक्ष्य दिल्लीने लिलया पेलत मुंबईल धूळ चारली आहे.

17:57 (IST) 27 Mar 2022
दिल्लीला मोठा झटका, ऋषभ पंत बाद

दिल्लीला तिसरा झटका बसला आहे. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत बाद झाला असून त्याने अवघी एक धाव केली आहे.

17:53 (IST) 27 Mar 2022
मनदीप सिंग शून्यावर बाद

दिल्लीला सलग दुसरा झटका बसला आहे. दिल्लाचा मनदीप सिंग हा फलंदाज शून्य धावांवर तंबुत परतलाय.

17:50 (IST) 27 Mar 2022
दिल्लीला पहिला झटका, टीम सेफर्ट बाद

दिल्ली कॅपिटल्सला टीम सेफर्टच्या रुपात पहिला झटका बसला आहे. सेफर्ट २१ धावांवर बाद झालाय.

17:16 (IST) 27 Mar 2022

मुंबई इंडियन्सने पूर्ण वीस षटके खेळत दिल्ली कॅपिटल्ससमोर १७८ धावांचे लक्ष्य उभे केले आहे. मुंबईने पाच गडी गमवून १७७ धावा केल्या आहेत.

16:50 (IST) 27 Mar 2022
मुंबई इंडियन्सला चौथा झटका

मुंबई इंडियन्सचा चौथा गडी बाद झाला आहे. किरॉन पोलार्डने फक्त आठ धावा केल्या असून तो बाद झाला आहे.

16:44 (IST) 27 Mar 2022
मुंबईच्या ११८ धावा, तीन गडी बाद

मुंबई इंडियन्सला तिलक वर्माच्या रुपात तिसरा झटका बसला आहे. सध्या मुंबईच्या १४ षटकांत ११८ धावा झाल्या आहेत.

16:17 (IST) 27 Mar 2022
मुंबई इंडियन्सला रोहित शर्माच्या रुपात पहिला झटका

मुंबई इंडियन्सला रोहित शर्माच्या रुपात पहिला झटका बसला आहे. रोहित शर्मा ४१ धावांवर बाद झाला आहे.

15:48 (IST) 27 Mar 2022
मुंबई इंडियन्सच्या २५ धावा

रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी मैदानावर आपली पकड जमवली असून दोघेही संयम राखून खेळत आहेत. मुंबई इंडियन्सच्या २८ धावा झाल्या आहेत.

15:37 (IST) 27 Mar 2022
ईशान किशन आणि रोहित शर्मा फलंदाजीसाठी मैदानात

मुंबई इंडियन्सकडून ईशान किशन आणि रोहित शर्मा फलंदाजीसाठी उतरले आहेत.

15:35 (IST) 27 Mar 2022
मुंबई इंडियन्स फलंदाजीसाठी मैदानात

मुंबई इंडियन्स हा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. तर दिल्ली कॅपिटल्सने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय.

Story img Loader