IPL 2022, DC vs MI : आयपीएलच्या १५ व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यामध्ये केकेआरने चेन्नईला पराभूत केलं आहे. आज साडेतीन वाजता आयपीएलच्या इतिहासातील सर्वात शक्तीशाली मुंबई इंडियन्स हा संघ दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार आहे. मुंबईमधील ब्रेबॉर्न स्टेडियमवर दुपारचे साडे तीन वाजता हा सामना रंगणार असून दोन्ही संघ विजयी अभियानासाठी उत्सुक आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयपीएलचा दुसरा सामना चांगलाच रोमहर्षक होणार आहे. कारण आजचा सामना हा मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिट्लस या दोन बलशाली संघांमध्ये खेळला जाणार आहे. मुंबईने आपयीएलच्या इतिहासात आतापर्यंत पाच वेळा जेतेपद पटकावले असून मुंबईचे नेतृत्व रोहित शर्मा करतोय. तर दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व ऋषभ पंत करणार आहे. दिल्ली कॅपीटल्सने आतापर्यंत एकदाही आयपीएल क्रिकेटमध्ये जेतेपदापर्यंत मजल मारलेली नाही. त्यामुळे यावेळी हा संघ पूर्ण ताकतीने मैदानात उतरणार आहे.

मुंबई इंडियन्सचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, किरॉन पोलार्ड, फॅबियन ऍलन, मुरुगन अश्विन, जयदेव उनाडकट, टायमल मिल्स, जसप्रीत बुमराह

दिल्ली कॅपिटल्सचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

ऋषभ पंत (कर्णधार, यष्टीरक्षक), टीम सेफर्ट, पृथ्वी शॉ, सरफराज खान, मनदीप सिंग, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, चेतन साकारिया, खलील अहमद, कुलदीप यादव

मुंबई इंडियन्स विजयाने सुरुवात करणार ?

मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत पाच वेळा जेतेपद पटकावलेलं आहे. त्यामुळे या संघाकडे कसलेले आणि अनुभवी खेळाडू आहेत. या संघाने किरॉन पोलार्ड, इशाक किशन, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रित बुमहार या दिग्गज खेळाडूंना संघात कायम ठेवलेले आहे. मात्र सूर्यकुमार यादवसारखा दिग्गज खेळाडू पहिल्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे मुंबईला मधल्या फळीत जपून खेळावे लागणार आहे. तर दुसरीकडे मुंबईकडे गोलंदाजांचीही मोठी फौज आहे. जसप्रीत बुमराहसारखा तगडा गोलंदाज मुंबईकडे आहे. तर त्याच्यासोबत जयदेव उनाडटक असेल. तसेच मयांक मार्कंडेय आणइ मुरुगन अश्विनसारखे फिरकीपटूदेखील मुंबईकडे आहेत.

दिल्ली पूर्ण ताकतीने मैदानात उतरणार

दुसरीकडे दिल्ली कॅपीटल्सने आतापर्यंत आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नसली तरी यावेळी हा संघ मोठ्या ताकतीने सलामीच्या सामन्याला उतरणार आहे. कर्णधार ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, रोवमन पॉवेलसारखे फलंदाज दिल्लीच्या ताफ्यात आहेत. तर कुलदीप यादव, खलील अहमद यांच्यासारख्या गोलंदाजांवर दिल्लीची भिस्त असेल.

सामना कधी सुरु कोठे सुरु होणार ?

सामना मुंबई येथील ब्रेबॉर्न स्टेडियमवर दुपारी साडेतीन वाजता सुरु होणार

सामना कोठे पाहता येईल ?

स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट २, १ हिंदी, सिलेक्ट १ तसेच हा सामना Disney plus Hotstar वर लाईव्ह पाहता येईल.

तसेच सामन्याचे सर्व अपडेट तुम्हाला loksatta.com या लोकसत्ताच्या ऑफिशियल वेबसाईटवरदेखील मिळतील.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 dc vs mi match live updates delhi capitals and mumbai indians score