आयपीएलच्या २७ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामना चांगलाच अटीतटीच ठरला. या सामन्यात बंगळुरुने दिल्लीला धूळ चारली असून १६ धावांनी दणदणीत विजय नोंदवला. या विजयासाठी दिनेश कार्तिक आणि मॅक्सवेल यांनी फलंदाजी विभागात मोठी मेहनत घेतली. तर जोश हेझलहूड तीन विकेट घेत बंगळुरुला विजयापर्यंत घेऊन गेला. बंगळुरुने दिल्लीला १९० धावांचे आव्हान दिलेले असताना दिल्ली कॅपिटल्स संघ फक्त १७३ धावा करू शकला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> “हा तर मरिन ड्राइव्ह आणि राजभवनापर्यंत षटकार मारतोय,” दिनेश कार्तिकची फलंदाजी पाहून बड्या व्यक्तीची प्रतिक्रिया

नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या बंगळुरुने जोरदार फटकेबाजी केली. सलामीला आलेले फाफ डू प्लेसीस आणि अनुज रावत या जोडीने निराशा केली. फाफ डू प्लेलीस अवघ्या आठ धावा करुन झेलबाद झाला. तर अनुज खातदेखील खोलू शकला नाही. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेला विराट कोहलीदेखील बारा धावांवर धावबाद झाला.

हेही वाचा >>> IPL 2022, MI vs LSG : सचिनच्या बाजुला बसला अर्जुन तेंडुलकर, सामन्यातील गुरु-शिष्याचे फोटो व्हायरल

विराट बाद झाल्यानंतर बंगळुरुच्या ५० धावा आणि तीन गडी बाद अशी स्थिती झाली. त्यानंतर मात्र तिसऱ्या विकेटसाठी आलेल्या मॅक्सवेलने अर्धशतकी खेळी करत बंगळुरूची बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्याने ३४ चेंडूंमध्ये सात चौकार आणि दोन षटकार लगावत ५५ धावा केल्या. कुलदीप यादवच्या चेंडूचा सामना करताना तो झेलबाद झाला. त्यानंतर प्रभुदेसाईदेखील आपली कमाल दाखवू शकला नाही. तो अवघ्या सहा धावा करून झेलबाद झाला.

हेही वाचा >>> IPL 2022: सलग सहाव्या पराभवामुळे मुंबई इंडियन्स Playoffs आधीच स्पर्धेतून बाहेर?; पाहा Qualification चं गणित काय सांगतंय

शेवटी शाहबाज अहमद आणि दिनेश कार्तिक या जोडीने बहारदार फलंदाजी करत दिल्लीच्या गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडले. शाहबाजने २१ चेंडूंमध्ये नाबाद ३२ धावा केल्या. तर दिनेश कार्तिकने ३४ चेंडूंमध्ये अर्थशतकी खेळी करत पाच चौकार आणि पाच षटकार लगावात नाबाद ६६ धावा केल्या. प्रभुदेसाई बाद झाल्यानंतर बंगळुरु संघ १५० धावा करु शकेल का अशी शंका उपस्थित केली जात असताना दिनेश कार्तिक आणि शाहबाज अहमद या जोडीने धडाकेबाज फलंदाजी करत बंगळुरुला १८९ धावांपर्यंत नेऊन ठेवलं.

हेही वाचा >>> IPL 2022, MI vs LSG : लखनऊचा ‘सुपर’ विजय, मुंबईच्या पदरी सलग सहावा पराभव

बंगळुरने दिलेल्या १९० धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी आलेल्या दिल्लीची सुरुवात चांगली झाली. दिल्लीचा पहिला गडी संघाच्या ५० धावा झालेल्या असताना बाद झाला. सलामीला आलेल्या पृथ्वी शॉने १६ धावा केल्या. तर डेविड वॉर्नरने बंगळुरुच्या गोलंदाजांची धुलाई करत ३८ चेंडूंमध्ये पाच षटकार आणि चार चौकार लागावत ६६ धावा केल्या. वॉर्नरनतंर मात्र दिल्लीचा एकही फलंदाज चांगली खेळी करू शकला नाही.

हेही वाचा >>> IPL 2022 : मुंबई विरोधात झळकावले दमदार शतक, पण सेलिब्रेशन करताना केएल राहुल कान का बंद करतो ?

मिशेल मार्शने १४ धावा केल्या. तर ऋषभ पंत ३४ धावा करुन झेलबाद झाला. मधल्या फळीतील रोवमन पॉवेल (०), ललित यादव (१), शार्दुल ठाकुर (१७) यांनी निराशा केली. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव नाबाद राहिले. वीस षटके संपेपर्यंत त्यांनी प्रत्येकी दहा धावा केल्या. शेवटी दिल्लीला १७३ धावांपर्यंत मजल मारता आल्यामुळे बंगळुरुचा १६ धावांनी विजय झाला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 dc vs rcb royal challengers bangalore defeated delhi capitals by 16 runs prd