आयपीएल २०२२ मधील पंचांच्या निर्णयावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यादरम्यान पंचांच्या निर्णयामुळे नव्या वादाला तोंड फुटले. दिल्लीचा संघ हा सामना १५ धावांनी हरला. पण सामन्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. अंपायरने नो-बॉल न दिल्याने हा वाद पाहायल मिळाला. दिल्लीला विजयासाठी सहा चेंडूत ३६ धावा करायच्या होत्या. रोव्हमन पॉवेलने पहिल्या तीन चेंडूंवर सलग तीन षटकार मारून दिल्लीला सामन्याच्या जवळ आणले होते.

ओबेद मॅककॉयचा चेंडू फुल टॉस होता आणि दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने त्याला नो बॉल देण्याची मागणी केली होती. मात्र, मैदानावरील पंचांनी नो बॉल दिला नाही. त्याच्या वतीने टीव्ही अंपायरकडे रिव्ह्यूची मागणी करण्यात आली होती, पण पंचांनीही ती मान्य केली नाही. यानंतर कर्णधार ऋषभ पंतने आपले दोन्ही फलंदाज पॉवेल आणि कुलदीपर यादव यांना मैदानाबाहेर बोलावण्याचे संकेत दिले. गोलंदाजी प्रशिक्षक शेन वॉटसन यांनीही पंतकडे जाऊन त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पंत इथेच थांबला नाही आणि त्याने जोस बटलरशी वाद घालण्यास सुरुवात केली.

यानंतर फलंदाजी प्रशिक्षक प्रवीण आम्रे यांनी मैदानात प्रवेश करून पंचांशी वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतरही अंपायरने थर्ड अंपायरची मदत न घेतल्याने अमरे यांना मैदान सोडण्यास सांगितले. अमरे मैदानाबाहेर गेले आणि त्यानंतर सामना पुन्हा सुरू होऊ शकला. तो चेंडू पॉवेलच्या कमरेवरुन जात असल्यामुळे नो बॉलवर देण्याचा वाद सुरू झाला. या वादानंतर पॉवेल चौथा चेंडू खेळू शकला नाही आणि पाचव्या चेंडूवर त्याने दोन धावा घेतल्या. त्याला शेवटच्या चेंडूवर मोठा फटका मारायचा होता पण त्याने चेंडू हवेत मारला आणि संजू सॅमसनने झेल घेत त्याचा डाव संपवला आणि दिल्लीवर विजयाची नोंद केली.

शुक्रवारी आयपीएल २०२२ च्या ३४ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सचा १५ धावांनी पराभव केला. या विजयासह संजू सॅमसनच्या संघाने पुन्हा गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले आहे. राजस्थान व्यतिरिक्त, गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांचेही १०-१० गुण आहेत, परंतु चांगल्या नेट रनरेटमुळे राजस्थान त्यांच्यापेक्षा पुढे आहे. प्रथम फलंदाजी करताना जोस बटलरच्या शतकाच्या जोरावर राजस्थानने दिल्लीसमोर २३३ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येसमोर दिल्लीला २० षटकात केवळ २०७ धावा करता आल्या.

Story img Loader