आयपीएलच्या पंधराव्या हंगामतील ३२ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाबला सहज नमवले. पंजाब किंग्जने ११६ धावांचे आव्हान दिल्यानंतर दिल्लीने हे आव्हान अवघे दहा षटकं आणि तीन चेंडूंमध्ये गाठले. पंजाबच्या या लाजीरवाण्या पराभवाला दिल्लीचा खेळाडू डेविड वॉर्नर हा कारणीभूत ठरलाय. त्याने नाबाद अर्धशतकी खेळी केल्यामुळे दिल्लीचा ९ गडी राखून विजय झाला आहे. या विजयानंतर वॉर्नरने पुष्पा स्टाईलने खास सेलिब्रेशन केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> विराट कोहली ते सुरेश रैना, ‘हे’ आहेत 5 खेळाडू ज्यांनी आयपीएलमध्ये केल्या आहेत सर्वाधिक धावा

पंजाबने दिलेल्या ११६ धावांचे आव्हान गाठण्यासाठी वॉर्नर सलामीला आला. सुरुवातीपासून फटकेबाजी करत त्याने पंजाबच्या गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडले. वॉर्नरने अवघ्या ३० चेंडूंमध्ये १० चौकार आणि १ षटकार लगावत ६० धावांची नाबाद खेळी केली. दिल्लीच्या या विजयासाठी वॉर्नला पृथ्वी शॉने साथ दिली. दिल्लीने ९ गडी आणि ९ षटकांसह तीन चेंडू राखून हा सामना खिशात घातलं. विशेष म्हणजे दिल्लीला विजय मिळवून दिल्यानंतर वॉर्नरने पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन केलं. तंबुत परतत असताना त्याने पुष्षा चित्रपटातील अभिनेता अल्लू अर्जुनची स्टाईल कॉपी केली आहे. त्याची ही स्टाईल सध्या चर्चेचा विषय ठरतेय.

हेही वाचा >>> IPL वर करोनाचं सावट, २२ एप्रिल रोजीच्या राजस्थान-दिल्ली सामन्याबाबत घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय

दरम्यान, दिल्ली कॅपिट्लस संघातील दोन खेळाडू आणि चार इतर सहकाऱ्यांना करोनाची लागण झालेली असल्यामुळे आजचा सामना होणार का असे विचारले जात होते. करोना संकाटने ग्रासल्यामुळे दिल्ली संघाचे मनोधैर्य खचलेले असावे असा अंदाज बांधला जात होता. मात्र दिल्लीने दिमाखदार विजय मिळवून आपलं कर्तृत्व पुन्हा एकदा सिद्ध केलं.