आयपीएलचे सामने सुरु होऊन आठवडा उलटून गेलाय. आयपीएल क्रिकेट पुढे जात असताना सर्वच सामने रोमहर्षक होत आहेत. तर दुसरीकडे आयपीएलमध्ये वेगवेगळे विक्रम करणारे खेळाडू मौजमस्ती करताना दिसत आहेत. सध्या दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंचा एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा अक्षर पटेल मूळचा न्यूझीलंडचा खेळाडू आणि सध्या दिल्लीकडून खेळणाऱ्या टीम सेफर्टला चक्क डान्स शिकवत आहे. बसमधील हा मजेदार व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बसमध्ये टीम सेफर्टसोबत नेमकं काय घडलं ?

पुण्यामध्ये आपला दुसरा सामना खेळण्याआधी दिल्लीच्या खेळाडूंनी बसमध्ये धम्माल मस्ती केली. टीम सेफर्ट बसमध्ये बसलेला असताना संघातील बाकीचे खेळाडू त्याला चक्क डान्स शिकवत होते. आयुष्मान खुरानाने मुख्य भूमिका साकारलेल्या विकी डोनर या चित्रपटातील बल्ब उतारो या गाण्यावर दिल्लीचे खेळाडू सेफर्टला डान्स शिकवत होते. व्हिडीओमध्ये दिल्लाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल सेफर्टच्या बाजूला उभा असल्याचे दिसत आहे. तर कुलदीप यादव त्यांच्याकडे पाहत आहे. विशेष म्हणजे शेफर्ट कुलदीप तसेच दिल्लीच्या इतर खेळाडूंकडे लक्षपूर्वक पाहून डान्स शिकतोय. शेफर्ट विकी डोनर चित्रपटातील बल्ब उतारो या गाण्यातील स्टेप्स करताना दिसतोय.

हा मजेदार व्हिडीओ खुद्द दिल्ली कॅपिट्लसने त्यांच्या सोशल मीडियावर अपलोड केला आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने या हंगामातील आपल्या पहिल्याच सामन्यात पाच वेळा जेतेपद पटकावलेल्या मुंबई इंडियन्सला धूळ चारली. आपयीएलच्या पंधराव्या हंगामात पहिल्याच सामन्यात हे यश संपादन केल्यामुळे दिल्लीचा आत्मविश्वास वाढला आहे. दिल्ली आपला दुसरा सामना २ एप्रिल रोजी पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन स्टेडियममध्ये खेळणार आहे. या सामन्यात दिल्ली गुजरात टायटन्सशी दोन हात करेल.