इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या मोसमात करोनाने पुन्हा एकदा शिरकाव केला आहे. दिल्ली कॅपिटल्सचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट हे करोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे आता संपूर्ण दिल्ली संघाला क्वारंटाईन करण्यात आले आहे. पॅट्रिक हे सध्या तो सध्या आयसोलेशनमध्ये आहेत आणि दिल्ली कॅपिटल्सचे वैद्यकीय पथक त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून आहे. त्यानंतर आता संपूर्ण संघालाच क्वारंटाईन करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दिल्ली कॅपिटल्स संघाचा पुढील सामना पुण्यात होणार आहे. यासाठी संघाला निघाला होता, मात्र त्यांना हॉटेलमध्येच थांबवण्यात आले आहे. आता दोन दिवस सर्व खेळाडूंची करोना चाचणी होणार आहे. त्यानंतरच निर्णय घेतला जाणार आहे.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाला पंजाब किंग्जविरुद्ध पुढील सामना खेळायचा आहे. हा सामना २० एप्रिल रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी दिल्लीचा संघ १८ एप्रिललाच पुण्याला रवाना होणार होता, मात्र या संघाला मुंबईतील हॉटेलमध्येच क्वारंटाईन करण्यात आले आहे.

आणखी एक खेळाडू पॉझिटिव्ह

दरम्यान, दिल्ली संघाचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. वृत्तानुसार, पॅट्रिकनंतर दिल्ली संघाचा एक खेळाडूही रॅपिड अँटीजेन चाचणीत पॉझिटिव्ह आढळला आहे. यामुळेच दिल्ली फ्रँचायझीने हे मोठे पाऊल उचलले आहे. आता सर्व खेळाडूंची दोन दिवस आरटी-पीसीआर चाचणी केली जाईल, त्यानंतरच निर्णय घेतला जाईल.

मागील आयपीएल हंगाम देखील भारतात सुरू झाला होता, जो कोरोना महामारीमुळे ४ मे २०२१ रोजी स्थगित करण्यात आला होता. तोपर्यंत लीगमध्ये फक्त २९ सामने झाले होते. मागील हंगामात, सनरायझर्स हैदराबाद यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा आणि दिल्ली कॅपिटल्सचा फिरकी गोलंदाज अमित मिश्रा करोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे आयपीएल मध्यंतरी स्थगित करण्यात आली. नंतर बीसीसीआयने उर्वरित सामने यूएईमध्ये यशस्वीरित्या आयोजित केले. करोनामुळे, आयपीएलचा २०२० चा हंगाम देखील पूर्णपणे यूएईमध्ये आयोजित करण्यात आला होता. करोनामधील हे सर्व आयपीएल सीझन बायो-बबलमध्येच झाले होते.