आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील बंगळुरु आणि पंजाब यांत्यातील सामना चांगलाच चुरशीचा ठरला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विद्यामान कर्णधार फाफ डू प्लेसिसने नेत्रदीपक कामगिरी केली. तसेच बंगळुरुचा माजी कर्णधार विराट कोहलीनेदेखील मोठे फटका लगावत ४१ धावा करुन संघाला २०५ अशी मोठ्या धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवले. दरम्यान आयपीएलच्या पंधराव्या हंगामात फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली यां आजी आणि माजी कर्णधारांनी नवे वेगवेगळे विक्रम रचले आहेत.

फाफ डू प्लेसिसने ५७ चेंडूंमध्ये ८८ धावा करुन पंजाबच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्यांने ही धावसंख्या करताना तब्बल ७ षटकार आणि ३ चौकार लगावले. बंगळुरुचे कर्णधारपद येताच पदार्पणातच डुप्लेसिसने अर्धशतक झळकावले आहे. तसेच आजच्या सामन्यात त्याने ३ हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. आयपीएलच्या इतिहासात तीन हजार धाव करणारा तो सहावा परदेशी खेळाडू ठरला आहे. याआधी हा पराक्रम ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स, डेव्हिड वॉर्नर, शेन वॉटसन आणि किरॉन पोलार्ड यांनी केलेला आहे.

तर दुसरीकडे बंगळुरु संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने आजच्या सामन्यात नवा विक्रम केला. दोनशे डाव खेळणारा विराट तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी रोहित शर्माच्या नावावर २०९ तर सुरेश रैनाने २०० डाव खेळलेले आहेत. विराट कोहली २०० डाव खेळणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. बंगळुरुच्या या आजी-माजी कर्णधारांनी पहिल्याच सामन्यात असे विक्रम केले आहेत.

Story img Loader