आयपीएलचा पंधरावा हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन संघांनी याआधीच प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. तर उरलेल्या संघांमध्ये प्लेऑफर्यंत पोहोचण्यासाठी चढाओढ रंगली आहे. असे असताना आता बीसीसीआयने अंतिम सामन्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या सामन्याची वेळ बदलण्यात आली आहे.

हेही वाचा >>> आयपीएलच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सर्वात यशस्वी ठरलेले ‘हे’ तीन संघ स्पर्धेतून बाहेर

येत्या २९ मे रोजी आयपीएल क्रिकेटचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. याआधी या सामन्याची सुरुवात सायंकाळी ७.३० वाजता होणार होता. तर अर्ध्या तासाआधी म्हणजेच ७ वाजता नाणेफेक होणार होती. मात्र आता बीसीसीआयने या सामन्याची वेळ बदलण्याचा निर्णय घेतला असून सामना ७.३० ऐवजी अर्धा तसा उशिराने म्हणजेच ८ वाजता सुरु होण्याची शक्यता आहे. तर नाणेफेक ७.३० वाजता केली जाऊ शकते.

हेही वाचा >>> IPL 2022 RCB vs GT : आज बंगळुरु संघासाठी ‘करो या मरो,’ गुजरातशी करणार दोन हात, जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

सामना उशिराने सुरु करण्याचे नेमके कारण काय?

क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयकडून आयपीएलमध्ये पुन्हा एकदा ओपनिंग आणि क्लोजिंग शेरेमनी (उद्घाटन आणि समापन समारोह) आयोजित करण्याचा विचार केला जात आहे. या हंगामात उद्घाटन समारंभाचे आयोजन करता आले नाही. मात्र यावेळी समापन समारोह आयोजित केला जाणार आहे. हा समारोहाची सुरुवात ६.३० वाजता सुरु होणार असून तो ५० मिनिटांचा असेल. समापन समारोह संपल्यानंतर नाणेफेक आणि अंतिम सामन्याला सुरुवात होईल. याच कारणामुळे आयपीएलचा अंतिम सामना अर्धा तास उशिराने सुरु होणार आहे.

हेही वाचा >>> LSG vs KKR : ९ मॅचनंतर संधी मिळालेल्या एव्हिन लुईसनचा झेल ठरला ‘टर्निंग पॉइंट’; केकेआरकडून सामना घेतला हिसकावून

दरम्यान, आयपीएलचा अंतिम सामना अहमदाबादमधील मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सध्या प्लेऑफमध्ये लखनऊ आणि गुजरात या संघांनी आपले स्थान पक्के केले आहे. आणखी दोन संघाची प्लेऑफमध्ये निवड झाल्यानंतर एकूण चार संघांमध्ये प्लेऑफचे सामने खेळवले जातील. त्यानंतर टॉप दोन संघांमध्ये अंतिम सामना खेळवला जाईल.

Story img Loader