आयपीएल क्रिकेटमध्ये दाखल झालेल्या गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना रंगला आहे. दोन्ही संघांचा हा पहिला सामना असल्यामुळे ही लढत चांगलीच रंगतदार ठरतेय. सामन्याच्या सुरुवातीपासून गुजरातच्या गोलंदाजांमुळे लखनऊचे फलंदाज जेरीस आले आहेत. मोहम्मद शमीने तर पहिल्याच चेंडूमध्ये केएल राहुलला टिपून लखनऊ संघाला चिंतेत टाकलंय. दरम्यान, गुजरातच्या सुभमन गिलने लखनऊच्या एविन लुईसचा टिपलेला झेल सध्या चर्चेचा विषय ठरतोय.
सामन्याच्या पहिल्याच चेंडूमध्ये मोहम्मद शमीने केएल राहुलला शून्यावर बाद केलं. त्यानंतर शमीनेच क्विंटन टिकॉकचा सात धावंवर बळी घेतला. नंतर लखनऊच्या वीस धावा असताना वरुन अनॉनने फेकलेल्या चेंडूवर एविन लुईसने जोरात फटका मारला. मात्र चेंडू मैदानाबाहेर पडण्याऐवजी हवेत उचं झेपावला. ही संधी साधत अशक्य वाटणारा झेल शुभमन गिलले उडी घेत हवेतच टिपला. परिणामी लुईसला अवघ्या दहा धावांवर तंबुत परतावं लागलं.
लुईसने फटका मारलेला चेंडू हवेत झेलने जवळपास अशक्यच होते. मात्र जीवाची बाजी लावून सुभमनने धावत जाऊन झेल टिपला. त्याने घेतलेल्या या कॅचची सध्या विशेष चर्चा होत आहे.