आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील दहावा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगला. गुजरात टायटन्सच्या शुभमन गिलने तर धामाकेदार खेळ करत मैदानावर धावांचा पाऊस पाडला. त्याने ४६ चेंडूंमध्ये ८४ धावा केल्या.

नाणेफेक जिंकल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर गुजरात टायटन्सकडून फलंदाजीसाठी आलेल्या मॅथ्यू वेडने निराशाजनक कामगिरी केली. मात्र शुभमन गिलने धमाकेदार फलंदाजी करत फक्त ४६ चेंडूंमध्ये ८४ धावा केल्या. या धावा करताना त्याने चार षटकार आणि सहा चौकार लगावले. सलामीवीर शुमन गिल आणि कर्णधार हार्दिक पांड्या यांनी मैदानावर टिकून राहत गुजरात संघाचा धावफलक धावता ठेवला. हार्दिक पांड्या आणि शुभमन गिल यांच्यात ६५ धावांची भागिदारी झाली.

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील दहावा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगला. गुजरात टायटन्सच्या शुभमन गिलने तर धामाकेदार खेळ करत मैदानावर धावांचा पाऊस पाडला. त्याने ४६ चेंडूंमध्ये ८४ धावा केल्या.

शुभमनच्या या खेळामुळे गुजरातला १७० धावांचा टप्पा पूर्ण करत १७१ धावा करता आल्या. मात्र शुभमने मैदानावर चांगल्या प्रकारे पाय रोवलेले असताना खलील अहमदने टाकलेल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीसा गोंधळल्यामुळे शुभमन गिल फटका मारण्यात चुकला आणि चेंडू ऋषभ पंतच्या हातात विसावला.

Story img Loader