IPL 2022 , GT vs LSG Highlights : आयपीएलचा पंधराव्या हंगामातील चौथा सामना सुरु झाला आहे. आजच्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात लढत होत आहे. दोन्ही संघामध्ये दिग्गज आणि सामना कोणत्याही क्षणी फिरवण्याची क्षमता असलेले खेळाडू आहेत. आजच्या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि लखनऊचा कर्णधार केएल राहुल यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. या हंगामातील पहिला सामना जिंकून विजयी सुरुवात करण्यासाठी हे दोन्ही संघ प्रयत्नरत आहेत. आजचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जातोय.
गुजरात टायटन्सचा दणदणीत विजय झाला असून लखऊने उभं केलेलं १५८ धावांचं आव्हान गुजरातने लिलया पेललं आहे. विजय तेवतीयाने मैदानावर पाय रोवून सामना फिरवल्यामुळे गुजरातला विजयाची गोडी चाखता आली.
गुतरातला मॅथ्यू वेडच्या रुपात चौथा धक्का बसला आहे. मॅथ्यू वेडने तीस धावा केल्या.
हार्दिक पांड्या ३३ धावांवर झेलबाद झाला आहे. सध्या गुजरातच्या ७३ धावा झाल्या आहेत.
गुजरात टायटन्सचे दोन गडी बात झाले असून आतापर्यंत गुजरातच्या २५ धावा झाल्या आहेत.
लखनऊने सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात जोरदार कमबॅक करत गुजरातसमोर १५९ धावांचं लक्ष्य उभं केलं.
दीपक हुडा आणि आयुष बदोनी यांनी लखनऊला सावरलं आहे. आतापर्यंत लखनऊच्या १४८ धावा झाल्या असून पाच गडी बाद झाले आहेत.
लखनऊला चौथा झटका बसला असून मनिष पांडे फक्त सहा धावांवर बाद झाला आहे.
लखनऊला दुसरा मोठा झटका बसला आहे. लखनऊचा फलंदाज क्विंटन डिकॉकने सात धावा केल्या आहेत.
पहिल्याच चेंडूत लखनऊला मोठा झटका बसला आहे. लखनऊचा कर्णधार केएल राहुल पहिल्याच चेंडूवर बाद झालाय.
गुजरात टायटन्सचे नाणेफेक जिंकली असून गुजरातने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघ तयार झाले असून काही क्षणांत सामन्याला सुरुवात होणार आहे.
A look at the Playing XI for #GTvLSG
— IndianPremierLeague (@IPL) March 28, 2022
Live – https://t.co/u8Y0KpnOQi #GTvLSG #TATAIPL https://t.co/IwRUSZE08H pic.twitter.com/uZfpKEI8A8
आजचा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि Disney plus Hotstar वर पाहता येईल. तसेच या सामन्याचे सर्व अपडेट्स loksatta.com या लोकसत्ताच्या ऑफिशियल वेबसाईटवरदेखील मिळतील.
केएल राहुल (कर्णधार ), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), एविन लुईस, मनीष पांडे, दीपक हुडा, क्रुणाल पांड्या, कृष्णप्पा गौथम, रवी बिश्नोई, अँड्र्यू टाय, अंकित राजपूत, आवेश खान
शुभमन गिल, रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), मॅथ्यू वेड, विजय शंकर, डेव्हिड मिलर, हार्दिक पंड्या (कर्णधार), राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन, आर साई किशोर