पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळणारा गुजरात टायटन्सचा संघा हा प्लेऑफसाठी पात्र ठरणारा आयपीएल २०२२ मध्ये पहिला संघ ठरला आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात गुजरातने लखनऊविरुद्ध ६२ धावांनी शानदार विजय मिळवला. संघाच्या या विजयात अनेकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पण ज्या खेळाडूची सर्वाधिक चर्चा झाली तो म्हणजे शुभमन गिल. या सामन्यात गिलने सर्वाधिक धावा केल्या, तरीही तो ट्रोल्सच्या निशाण्यावर आला.

गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिलने मंगळवारी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात ४९ चेंडूत नाबाद ६३ धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून सात चौकार आले. गिलने १२८.२७ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या, ज्यासाठी त्याला खूप ट्रोल केले गेले. संथ फलंदाजीसाठी ट्रोल झालेला शुभमन केवळ सामन्यातील सर्वोत्तम धावा करणाराच नाही तर सामनावीर देखील ठरला. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर धावा काढणे सर्वच फलंदाजांसाठी खूप कठीण होते. सामना संपल्यानंतर शुभनमने आपल्या एका ट्विटने सर्व ट्रोलर्सचे तोंड बंद केले आहे.

IND vs AUS Paine criticism of Gautam Gambhir ahead Border Gavaskar Trophy
IND vs AUS : ‘… तो भारतीय क्रिकेट संघासाठी योग्य नाही’, रिकी पॉन्टिंगनंतर टिम पेनने गौतम गंभीरवर साधला निशाणा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
anshul kamboj
१० पैकी १० विकेट्स! अंशुल कंबोजचा रणजी स्पर्धेत विक्रम
Ranji Trophy Goa Batters Highest Ever Partnership in 90 Year Old History
Ranji Trophy: ६०६ धावांची विक्रमी भागीदारी अन् गोव्याच्या २ फलंदाजांची त्रिशतकं, रणजी ट्रॉफीच्या ९० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही
Pankaja Munde At Rally In Parali Beed.
“डोळ्यांसमोर कमळ येईल, पण तुम्ही घड्याळाचेच बटन दाबा…” धनंजय मुंडेंच्या समोरच काय म्हणाल्या पंकजा? पाहा व्हिडिओ
Suryakumar Yadav made big mistake in India lost the second T20I against South Africa
Suryakumar Yadav : कर्णधार सूर्यकुमार यादवची ‘ती’ चूक टीम इंडियाला पडली महागात, यजमानांनी भारताच्या तोंडचा घास हिरावला
Maharashtra coach Sulakshan Kulkarni regretted the loss of victory sports news
निराशाजनक पराभवामुळे आव्हान खडतर! विजय निसटल्याची महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना खंत

गिल ४९ चेंडूत ६३ धावा करून नाबाद राहिला. या अर्धशतकाच्या जोरावर संघाला दीडशेच्या जवळपास पोहोचता आले. त्याच्या डावातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत क्रीजवर उपस्थित होता, पण त्याला एकही षटकार मारता आला नाही. मग ट्रोल्सना संधी मिळाली. संथ फलंदाजीसाठी लोकांनी त्याला जोरदार फटकारले.

शुभमन गिलचे संघासाठी सर्वोत्तम योगदान तेव्हा असेल जेव्हा तो १० षटकात बाद होईल.

शुभमन गिल, स्वार्थी फलंदाज. आणखी एक स्टेट पॅडर.

गिलने कसोटीतील चांगली खेळी खेळली.

शुभमन गिलने दिले उत्तर

सामन्याचा निकाल गुजरातच्या बाजूने लागला. या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नाही हे लखनऊच्या फलंदाजीवरून स्पष्ट झाले. शुभमनच्या नाबाद अर्धशतकाचे महत्त्व स्पष्टपणे समजले. मैदानातून बाहेर पडल्यानंतर गिलने सोशल मीडियाच्या ट्रोलर्सला उत्तर दिले. शुभमनच्या संथ फलंदाजीबाबत एका वेबसाइटने ट्विटरवर एक लेख शेअर केला आहे. शुभमनने हा लेख शेअर कासव-ससा यांचा इमोजी ट्विट केला आहे. गिलने आपल्या ट्विटद्वारे जुन्या गोष्टीचे उदाहरण देत आपल्या खेळीचे महत्त्व सांगितले. वेगवान खेळ करण्याच्या नादात तो लवकर बाद झाला असा तर कदाचित संघाला १४४ धावांपर्यंत मजल मारता आली नाही, असा संदेश गिलने दिला.

दरम्यान, गुजरात टायटन्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ६२ धावांनी विजय मिळवत प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. शुभमन गिल सुरुवातीच्या सामन्यांमध्ये फॉर्ममध्ये नसला तरी गेल्या काही डावांमध्ये तो चांगलाच फॉर्मात आहे. गिलने आतापर्यंत १२ सामन्यांत ३८४ धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत गिल आता टॉप-४ फलंदाजांमध्ये सामील झाला आहे.