IPL 2022 GT vs MI Playing XI : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ५१ वा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स या दोन तगड्या संघांमध्ये होणार आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर सायंकाळी ७.३० वाजता या सामन्याला सुरुवात होईल. मुंबई इंडियन्स संघ अगोदरच स्पर्धेतून बाहेर पडलेला आहे. त्यामुळे गमावण्यासाठी काहीही नसलेला हा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या गुजरात टायटन्ससाठी डोकेदुखी ठरू शकतो. त्यामुळेच गुजरात टायटन्स संघ पूर्ण ताकतीने आजच्या सामन्यात उतरणार आहे.
हेही वाचा >> Asian Games Postponed: चीनमध्ये करोनाचा कहर, आशियाई क्रीडा स्पर्धा पुढे ढकलली
गुजरात टायटन्स संघ गुणतालिकेत अव्व्ल स्थानी आहे. आजचा सामना जिंकून या संघाला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे. याच कारणामुळे हार्दिक पांड्या नेतृत्व करत असलेला गुजरात संघ आजचा सामना जिंकण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार आहे. तर दुसरीकडे गुणतालिकेत सर्वात शेवटी असेलला मुंबई संघ गुजरात टायटन्ससाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. कारण हा संघ अगोदरच स्पर्धेतून बाहेर पडलेला आहे. उरलेले सर्वच सामने जिंकले तरी मुंबईला प्लेऑफर्यंत पोहोचता येणार नाही. याच कारणामुळे आजच्या सामन्यात विजय नोंदवून गुजरातसाठी उपद्रव ठवण्यासाठी मुंबई संघ प्रयत्न करणार आहे.
हेही वाचा >> वॉर्नर-पॉवेलपुढे हैदराबाद निष्प्रभ!; दिल्लीचा २१ धावांनी विजय; गुणतालिकेत पाचव्या स्थानी
गुजरात संघातील हार्दिक पांड्या मागील काही सामन्यांपासून फॉर्ममध्ये आहे. असे असले तरी गुजरात संघाला पंजाब किंग्जविरोधातील सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्स संघातील इशान किशान सध्या फॉर्ममध्ये दिसत असून त्याच्या साथीला रोहित शर्मादेखील आजच्या सामन्यात चांगली कामगिरी करु शकतो. याआधीच्या सामन्यात मुंबईने राजस्थान रॉयल्सला पराभूत करुन या हंगामातील पहिला विजय मिळवलेला आहे.
हेही वाचा >> चॅम्पियन्स लीग फुटबॉल : रेयालची अंतिम फेरीत धडक; दोन टप्प्यांतील लढतीअंती मँचेस्टर सिटीवर निसटता विजय
गुजरात टायटन्स संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन
वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल, साई सुदर्शन हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्झारी जोसेफ, प्रदीप संगवान, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी
हेही वाचा >> IPL 2022 : विरेंद्र सेहवागचं CSK बद्दल मोठं विधान; म्हणाला ‘हा’ निर्णय चुकीचा होता
मुंबई इंडियन्स संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन
इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड/देवाल्ड ब्रेव्हिस, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, रिले मेरेडिथ