IPL 2022 GT vs PBKS Playing XI : आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आज ४८ व्या लढतीत पंजाब किंग्जसमोर गुजरात टायटन्सचे आव्हान असणार असणार आहे. हा सामना मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट अकॅडमी स्टेडियमवर आयोजित केला जाणार असून संध्याकाळी ७.३० वाजता या सामन्याला सुरुवात होईल. गुणतालिकेत अव्वल असलेला गुजरात टायटन्स संघ आजदेखील आपली विजयी आघाडी राखण्याचा प्रयत्न करणार आहे. तर दुसरीकडे पंजाब किंग्जसाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे हे दोन्ही संघ आज विजयासाठी पूर्ण ताकतीने प्रयत्न करणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> कनिष्ठ जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धा : हर्षदाची सुवर्णकमाई

गुणतालिकेचा विचार करायचं झालं तर गुजरात टायटन्स संघ सध्या अत्यंत मजबूत स्थितीत आहे. या संघाने आतापर्यंत नऊ सामन्यांपैकी आठ सामन्यांमध्ये विजय मिळवलेला असून फक्त एका सामन्यात या संघाला परावाचा सामना करावा लागलेला आहे. या धडाकेबाज कामगिरीमुळेच गुजरात संघ गुणतालिकेत अव्वल आहे. तर पंजाब किंग्ज संघाची स्थिती सध्या करो या मरो अशीच आहे. गुणतालिकेत पंजाब संघ शेवटून तिसऱ्या क्रमांकावर आहे. या संघाने एकूण नऊ सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे. तर बाकीच्या सहा सामन्यांत या संघाच्या पदरी पराभव आलेला आहे. त्यामुळे प्लेऑफपर्यंत मजल मारायची असेल तर पंजाबलाकआजचा सामना जिंकणे गरजेचे आहे. याच कारणामुळे पंजाब किंग्ज आजचा सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

हेही वाचा >>> भन्नाट गोलंदाजी! राजस्थानच्या कुलदीप सेनला तोड नाही, आरॉन फिंचला केलं क्लीन बोल्ड

आजच्या सामन्यात कोणाची सरशी होणार हे नक्की सांगणे अवघड आहे. कारण दोन्ही संघांकडे दमदार आणि सामन्याला कलाटणी देऊ शकणारे खेळाडू आहे. गुजरातच्या ताफ्यातील हार्दिक पांड्याने मागील काही सामन्यांत धमाकेदार फलांदाजी करत कर्णधार म्हणून चोख भूमिका बजावली आहे. तसेच या संघाकडे कठीण काळात मोठी खेळी खेळण्याची क्षमता असणारे राहुल तेवतिया आणि राशिद खान असे फलंदाज आहे. यामुळे हा संघ सध्या मजबूत मानला जातोय. तर दुसरीकडे पंजाब किंग्जकडेही मोठे फलंदाज आणि गोलंदाज आहे. सध्या शिखर धवन चांगल्या फॉर्ममध्ये आहे. शिखऱचा पंजाब संघाला चांगला आधार आहे. तर दुसरीकडे जॉनी बेअरस्टो आणि लियाम लिव्हिंगस्टोन हे खेळाडूदेखील तोडीस तोड आहेत. त्यामुळे पंजाब संघदेखील चांगला मजबूत असून दोन्ही संघांमध्ये मोठी लढत होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> IPL 2022, KKR vs RR : उमेश यादवची अफलातून कामगिरी, देवदत्त पडिक्कलचा टिपला भन्नाट झेल

आजचा सामना कोठे पाहाल ?

आजचा सामना स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी चॅनेल्सवर पाहता येईल. तसेच हा सामना Disney+ Hotstarवरही पाहता येईल.

गुजरात टायटन्स संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), साई सधर्शन, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अलझारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, मोहम्मद शमी</p>

हेही वाचा >>> सनरायझर्स हैदराबाद संकटात, वॉशिंग्टन सुंदर पुन्हा जखमी

पंजाब किंग्ज संघाचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन

मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), भानुका राजपक्षे, ऋषी धवन, कागिसो रबाडा, राहुल चहर, संदीप शर्मा, अर्शदीप सिंग</p>

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 gt vs pbks match know playing 11 of punjab kings and gujarat titans team know who will win prd