आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील २१ व्या सामन्यात अखेर गुजरातच्या विजयी घोडदौडीला रोखण्यात हैदराबादला यश आले. आतापर्यंत सलग तीन सामने जिंकलेल्या गुजरातचा हैदराबादने आठ गडी राखून पराभव केला. गुजरातने दिलेले १६२ धावांचे लक्ष्य हैदराबादने आठ गडी आणि पाच चेंडू राखून गाठले. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने मोठी खेळी करत संघासाठी मोठी धावसंख्या निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. हैदराबादच्या सलामीवीरांनी ६१ धावांची भागिदारी केल्यामुळे त्यांचा विजय सोपा झाला.

हेही वाचा >> देव तारी त्याला कोण मारी ! गुजरातच्या अभिनवला तीन वेळा जीवदान, संधीचा फायदा घेत केली धमाकेदार फलंदाजी

गुजरातने दिलेले १६३ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी हैदराबादचे अभिषेक मिलर आणि केन विल्यम्सन या जोडीने सुरुवातीपासून चांगली खेळी केली. विल्यम्सनने अर्धशतकी खेळ करत ४६ चेंडूंमध्ये ५७ धावा केल्या. तर अभिषेक शर्माने ३२ चेंडूंमध्ये सहा चौकरच्या मदतीने ४२ धावा केल्या. त्यानंतर दोघेही झेलबाद झाल्यानंतर राहुल त्रिपाठीने मोठे फटके मारत हैदराबादचा धावफलक धावता ठेवण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा >> सामन्याची नव्हे तर ‘या’ सुंदरीची होती चर्चा, दिल्ली आणि कोलकाता मॅचमधील मिस्ट्री गर्लचं नाव आलं समोर

मात्र खेळताना दुखापत झाल्यामुळे राहुल त्रिपाठीला रिटायर्ड हर्ट म्हणून तंबूत परतावे लागले. त्यानंतर मैदानात आलेल्या निकोलस पूरन आणि ऐडन मर्कराम या जोडीने संघाला विजयापर्यंत नेलं. शेवटच्या सात चेंडूंमध्ये पाच धावांची गरज असताना पूरनने चौकार लगावत विजय पक्का केला. तसेच शेवटच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर पूरनने षटकार लगावल्यामुळे शेवटी आठ गडी राखून हैदरबादने दणदणीत विजय संपादन केला.

हेही वाचा >> चेन्नईच्या सततच्या पराभवानंतर रवी शास्त्रींचं मोठं विधान; म्हणाले जाडेजा नाही तर ‘हा’ खेळाडू हवा होता CSK चा कर्णधार

यापूर्वी नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबादने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गुजरात टायटन्सने फलंदाजीसाठी येत मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला. मात्र सलामीला आलेले डेविड वेड आणि शुभमन गिल मैदानावर तग धरू शकले नाही. वेडने १९ तर शुभमन गिलने ७ धावा केल्या. दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या साई सुदर्शनने अकरा धावा केल्या. तर तिसऱ्या विकेटसाठी आलेल्या कर्णधार हार्दिक पांड्यांने जबाबदारीने फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. त्याने ४२ चेंडूंमध्ये चार चौकार आणि एक षटकार लगावत ५० धावा केल्या.

हेही वाचा >> अश्विनसोबत जे झालं ते कधीच घडलं नाही, आयपीएलच्या इतिहासात RR vs LSG सामन्यामध्ये पहिल्यांदाच रिटायर्ड आऊट

त्यानंतर अभिनव मनोहर वगळता गुजरातचा एकही फलंदाज चांगल्या धावा करु शकला नाही. डेविड मिलर बारा धावांवर झेलबाद झाला. तर अभिनव मनोहरला तीन वेला जीवदान मिळाल्यामुळे त्याने ३५ धावा करत गुजरातला १६२ धावांपर्यंत घेऊन जाण्यास मदत केली. सहा धावा करुन राहुल तेवतीया नाबाद राहिला. तर राशिद खान खातं न खोलता तंबुत पतला.

हेही वाचा >> विश्लेषण : रिटायर्ड आऊट म्हणजे नक्की काय रे भाऊ, नियम काय सांगतो ? जाणून घ्या सविस्तर

दरम्यान, गोलंदाजी विभागातही सनरायझर्स हैदराबादची कामगिरी चांगली राहिली गोलंदाजांनी गुजरात टायटन्सच्या फलंदाजांना रोखून धरलं. भुवनेश्वर कुमारने शुभमन गिल आणि अभिनव मनोहर यांना तंबूत पाठवलं. तर टी नटराजनने साई सुदर्शन आणि राशिद खान यांना बाद करत हैदराबादचा विजय सोपा केला. मार्को जानसेन आणि उमरान मिलक यांनी प्रत्येकी एका खेळाडूला बाद केलं.