आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील २१ वा सामना चांगलाच रोमांचकारी ठरला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने आठ घडी राखून दणदणीत विजय नोंदवत गुजरात टायटन्सला धूळ चारली. गुजरात संघाने आतापर्यंत एकही सामना गमावला नव्हता. मात्र हैदरबादने त्यांचा विजयी रथ रोखून दाखवला. दरम्यान, गुजरात टायटन्सला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेला असला तरी संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने मात्र मोठा विक्रम रचला आहे.

हेही वाचा >>> IPL 2022 : चेन्नईला मोठा धक्का ! १४ कोटीचा दीपक चहर IPL मधून बाहेर ?

आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान आणि कमी चेंडूंमध्ये १०० षटकार लगावणारा तो पहिला भारतीय आणि जगातील तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याने युवराज सिंग, ऋषभ पंत आणि युसूफ पठाण या दिग्गज खेळाडूंना मागे टाकलं आहे. आंद्रे रसेल आणि ख्रिस गेल या फलंदाजांनी याआधी असा पराक्रम नोंदवलेला आहे. रसेलने ६५७ चेंडूंमध्ये १०० षटकार लगावले आहेत. तर ख्रिस गेलने ९४३ चेंडूमध्ये १०० षटकार लगावण्याचा विक्रम नोंदवलेला आहे. या दोन फलंदाजांनातर आता हार्दिक पांड्या जगात तिसऱ्या स्थानावर असून त्याने १०४६ चेंडूमध्ये १०० षटकार लगावण्याची किमया केली आहे.

हेही वाचा >>> “…तर मी राजीनामा देईन”, हार्दिक पंड्याच्या अर्धशतकानंतर सोशल मीडियावर रंगली पोस्टर बॉयची चर्चा

सर्वात कमी चेंडूंमध्ये १०० षटकार लगावणारा हार्दिक पांड्या पहिला भारतीय ठरला आहे. त्याने १०४६ चेंडूंमध्ये १०० षटकार लगावलेले आहेत. तर ऋषभ पंत १२२४, युसुफ १३१३ आणि युवराज सिंगने १३३६ चेंडूंमध्ये १०० षटकार लगावले आहेत.

हेही वाचा >>> सामन्याची नव्हे तर ‘या’ सुंदरीची होती चर्चा, दिल्ली आणि कोलकाता मॅचमधील मिस्ट्री गर्लचं नाव आलं समोर

दरम्यान, हार्दिक पांड्याने या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. त्याने ४२ चेंडूंमध्ये चार चौकार आणि एक षटकार यांच्या मदतीने ५० धावा केल्या. या सामन्यात हार्दिकने फक्त एकच षटकार लगावला. मात्र हा एक षटकार हार्दिकच्या नावावर मोठा विक्रम नोंदवून गेला.

Story img Loader