आयपीएल क्रिकेटच्या १५ व्या हंगामाची सुरुवात येत्या २६ मार्चपासून होणार आहे. यावेळी एकूण दहा संघ एकमेकांविरोधात लढणार असून सर्वच सामने रोमहर्षक होणार आहेत. दरम्यान, जेतेपदासोबत आयपीएलमध्ये ऑरेंज आणि पर्पल कॅप कोणाकडे असणार याचीही उत्सुकता सर्वांनाच लागलेली असेल.
आयपीएलच्या हंगामामध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप दिली जाते. मात्र ज्या खेळाडूकडे ऑरेंज कॅप असेल त्या संघाला जेतेपद मिळेलच अशी हमी देता येत नाही. आतापर्यंतच्या १४ हंगामांपैकी ज्या खेळाडूकडे ऑरेंज कॅप असते, त्याच संघाचा विजय झाला असे फक्त दोन वेळा झालेले आहे. सर्वात अगोदार २०१४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या रॉबिन उथप्पाकडे ऑरेंज कॅप होती. उथप्पाने या सिझनमध्ये एकूण ६६० धावा केल्या करुन ऑरेंज कॅप जिंकली होती. या सिझनमध्ये उथप्पाच्या कोलकाताने ट्रॉफी जिंकली होती.
सहाव्या हंगामात ऋतुराजकडे ऑरेंज कॅप
तर उथप्पानंतर आयपीएलच्या ६ व्या सिझनमध्येही ज्या खेळाडूकडे ऑरेंज कॅप होती, तोच संघ विजयी झाला होता. ऋतुराज गायकवाडच्या माध्यमातून या इतिहासाची पुनरावृत्ती झाली होती. सहाव्या सिझनमध्ये ऋतुराजकडे ऑरेंज कॅप होती. तर ऋतुराजच्या चेन्नईने जेतेपद पटकावले होते. ऋतुराजने ६३५ धावा केल्या होत्या.
२०१० मध्ये सचिनकडे ऑरेंज कॅप
तर दुसरीकडे पाच वेळा जेतेपद पटकावून मुंबईसारख्या भक्कम संघाला फक्त एक वेळा म्हणजेच २०१० मध्ये ऑरेंज कॅप मिळवता आलेली आहे. २०१० मध्ये ऑरेंज कॅप सचिन तेंडुलकरच्या नावावर होती. मात्र या वर्षी चेन्नईने जेतेपद पटकावले होते.
वॉर्नरने तीन वेळा मिळवली ऑरेंज कॅप
दुसरीकडे डेव्हिड वॉर्नरने आतापर्यंत सर्वात जास्त म्हणजेच ३ वेळा ऑरेंज कॅप मिळवलेली आहे. वॉर्नर मूळचा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू असून त्याने २०१५, २०१७, २०१९ मध्ये ऑरेंज कॅप जिंकली होती. २००९ आणि २०१६ साली तर हैदराबाद टीमकडे ऑरेंज कॅप होती.