आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सर्वच सामने अटीतटीचे होत आहेत. आज १४ व्या सामन्यात मुंबई आणि कोलकाता यांच्यात तर रोमहर्षक लढत झाली असून या सामन्यात कोलकाताने मुंबईला पाच गडी राखून धूळ चारली आहे. मुंबईने दिलेले १६२ धावांचे लक्ष्य कोलकाताने १७ षटकांमध्येच गाठले. दरम्यान कोलकाताच्या या विजयाचे शिलेदार पॅटक कमिन्स आणि व्यंकटेश अय्यर ठरले आहेत.

मुंबईने दिलेले १६२ धावांचे लक्ष्य गाठताना कोलकाताला अजिंक्य रहाणेच्या रुपात पहिलाच झटका बसला. रहाणे पाचव्या षटकामध्ये सात धावांवर टायमल मिल्सने टाकलेल्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेला कोलकाताचा कर्णधा तिलक वर्मादेखील मोठी कामगीरी करू शकला नाही. तो दहा धावांवर असताना डॅनियल सॅम्सने टाकलेल्या चेंडूवर झेलबाद झाला. तिसऱ्या विकेटसाठी आलेला सॅम बिलिंग्सदेखील चांगली कामगिरी करु शकला नाही. १७ धावांवर असताना मुरगन अश्विनच्या चेंडूवर बिलिंग्सने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा >>> यष्टीरक्षक सॅम बिलिंग्सचा वायुवेग पाहून मुंबईचे खेळाडू अवाक्, देवाल्ड ब्रेविसला नेमकं कसं बाद केलं ?

याच प्रयत्नात चेंडू बसील थंपीच्या हातामध्ये विसावल्यामुळे बिलिंग्स १७ धावांवर बाद झाला. तर दुसरीकडे सलामीला आलेल्या तिलक वर्माने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. एकीकडे ठराविक अंतरावर गडी बाद होत असताना अय्यरने संयम दाखवत खेळ केला. त्याने ४१ चेंडूंमध्ये ६ चौकार आणि १ षटकार लगावात ५० धावा केल्या. तर चौथ्या विकेटसाठी आलेला नितीश राणादेखील चांगली कामगिरी करु शकला नाही. तो अवघ्या आठ धावा करून मुरगन अश्विनच्या चेंडूवर झेलबाद झाला. राणा बाद झाल्यानंतर संघाला सावरण्यासाठी आंद्रे रसेल मैदानात आला. रसेल कोलकाता संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत घेऊन जाईल अशी अपेक्षा होती मात्र तो ११ धावा करुन टायमल मिल्सच्या चेंडूवर झेलबाद झाला.

रसेलनंतर फलंदाजीसाठी आलेल्या पॅट कमिन्सने मात्र एकाच षटकात पूर्ण सामना फिरवला. कमिन्सने सोळाव्या षटकात तब्बल ३२ धावा करुन कोलकाताला सहज विजय मिळवून दिला.

हेही वाचा >>> IPL 2022 : राजस्थानकडून विजय खेचून आणल्यानंतर बंगळुरुचं जंगी सेलिब्रेशन, खेळाडूंनी गायलं खास गाणं, पाहा व्हिडीओ

यापूर्वी नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आलेल्या मुंबईची खराब सुरुवात झाली. तिसऱ्याच षटकात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा तीन धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या देवाल्ड ब्रेवीसने चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो २९ धावांवर यष्टीचित झाला. त्यानंतर मुंबईचा संघ ५५ धावांवर असताना इशान किशन १४ धावांवर झेलबाद झाला.

हेही वाचा >>> Video : युजवेंद्रचा खेळ पाहून आनंद गगनात मावेना, पत्नी धनश्री वर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा, स्टेडीयममधील व्हिडीओ व्हायरल

अकराव्या षटकात मुंबईची ५५ धावांवर तीन गडी बाद अशी स्थिती झालेली असताना तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी मुंबईला सावरलं. सूर्यकुमार यादवने ३६ चेंडूंमध्ये पाच चौकार आणि दोन षटकार यांच्या मदतीने ५२ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर तिलक वर्मानेदेखील (नाबाद) ३८ धावा करुन १६१ धावसंख्या करण्यासाठी मदत केली. किरॉन पोलार्डनेदेखील (नाबाद) फक्त पाच चेंडू खेळत २२ धावा केल्या.

हेही वाचा >>> संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सला मोठा झटका, ‘हा’ दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर

Story img Loader