आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ४७ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघांमध्ये अटीतटीची लढत झाली. या लढतीत कोलकाता नाईट रायडर्स संघाने राजस्थानवर सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला. राजस्थानने कोलकातासमोर विजयासाठी १५३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. कोलकाताला रोखण्यासाठी राजस्थानने शेवटपर्यंत प्रयत्न केला. मात्र शेवटी कोलकाताच्या नितीश राणा आणि रिंकू सिंग या जोडीने जबाबदारी स्वीकारत संघाला विजय मिळवून दिला.

हेही वाचा>>> भन्नाट गोलंदाजी! राजस्थानच्या कुलदीप सेनला तोड नाही, आरॉन फिंचला केलं क्लीन बोल्ड

राजस्थानने विजयासाठी दिलेले १५३ धावांचे लक्ष्य गाठताना कोलकाताला कसरत करावी लागली. सलामीला आलेले बाबा इंद्रजित (१५) आणि अरॉन फिंच (२) स्वस्तात बाद झाले. त्यानंतर मात्र श्रेयस अय्यरने कर्णधार म्हणून आपली जबाबदारी पार पडली. संघावर दबाव असताना अय्यरने ३२ चेंडूंमध्ये ३४ धावा केल्या. तो ट्रेंट बोल्टच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. मधल्या फळीतील फलंदाजांसाठी त्याने रस्ता सुकर करुन ठेवला.

हेही वाचा>>> IPL 2022, KKR vs RR : उमेश यादवची अफलातून कामगिरी, देवदत्त पडिक्कलचा टिपला भन्नाट झेल

अय्यर बाद झाल्यानंतर नितीश राणा आणि रिंकू सिंग ही जोडी संघाला विजयापर्यंत घेऊन गेली. या दोन्ही फलंदाजांनी नाबाद खेळी करत राजस्थानला पराभूत केलं. राणाने ४८ तर रिंगू सिंगने ४२ धावा केल्या.

हेही वाचा>>> सनरायझर्स हैदराबाद संकटात, वॉशिंग्टन सुंदर पुन्हा जखमी

यापूर्वी नाणेफेक जिंकून कोलाकाता संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सची सुरुवात खराब झाली. तिसऱ्याच षटकात सलामीला आलेला देवदत्त पडिक्कल उमेश यादवच्या चेंडूवर झेलबाद झाल. त्याला अवघ्या दोन धावा करता आल्या. त्यानंतर जोस बटलरदेखील मोठी खेळी करु शकला नाही. त्याला २२ धावा करता आल्या.

हेही वाचा>>> विश्लेषण : उमरान मलिकसारखा १५०च्या वेगानं चेंडू टाकायला काय लागतं?

सलामीचे दोन्ही फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या संजू सॅमसनने अर्धशतकी खेळी केली. त्याने ४९ चेंडूंमध्ये ५४ धावा करत राजस्थानला सावरलं. संजू सॅमसननंतर मात्र मधल्या फळीतील फलंदाज मोठी कामगिरी करु शकले नाहीत. करुण नायर (१३), रियान पराग (१९) स्वस्तात बाद झाले. तर शिमरॉन हेटमायर (२७) आणि आर अश्विन (६) या जोडीने नाबाद राहत शेवटपर्यंत धावा चोरण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा>>> LSG vs DC : गौतम गंभीरची मॅचमध्ये शिवीगाळ!; संतापलेल्या लखनऊ सुपर जायंट्सच्या मेंटॉरचा व्हिडिओ व्हायरल

गोलंदाजीबाबत बोलायचं झालं तर आजच्या सामन्यात राजस्थानचे गोलंदाज खास कामगिरी करु शकले नाहीत. युजवेंद्र चहलला एकही बळी घेतला आला नाही. फिरकीपटू रविंचद्रन अश्विनचही जादू चालू शकली नाही. ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, कुलदीप सेन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. तर कोलकाताच्या गोलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावत राजस्थानला रोखून धरण्यात यश मिळवलं. उमेश यादव, अनुकूल रॉय यांच्या भेदक माऱ्यासमोर राजस्थानचा निभाव लागला नाही. टीम साऊदीने दोन तर शिवम मावी, अनुकूल राॉय आणि उमेश यादव यांनी प्रत्येक एक विकेट घेतली

Story img Loader