आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ६१ व्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्स संघाने सनरायझर्स हैदरबादला धूळ चारली. आजच्या सामन्यात केकेआरने हैदराबादवर ५४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. कोलकाताने हैदराबादसमोर विजयासाठी १८८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र हैदराबाद संघ १२३ धावांपर्यंतच मजल मारु शकला. या पराभवानंतर आता हैदराबाद प्लेऑफपर्यंत पोहोचण्याची शक्यता धुसर झाली आहे.
हेही वाचा >>> अंबाती रायडू खरंच निवृत्त होणार? चेन्नईच्या सीईओंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…
कोलकाताने विजयासाठी १८८ धावांचे लक्ष्य दिल्यानंतर फलंदाजीसाठी येताच हैदराबाद संघाने आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र सलामीला आलेला केन विल्यम्सन फक्त ९ धावा करु शकला. तर अभिषेक शर्माने धडाकेबाज फलंदाजी करत २८ चेंडूंमध्ये ४३ धावा केला. दुसऱ्या विकेटसाठी आलेला राहुला त्रिपाठीदेखील (९) स्वस्तात बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी आलेल्या ऐडन मर्करामने ३२ धावांची खेळी करत संघाला विजयापर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केला.
हेही वाचा >>> आयपीएल मॅच फिक्सिंग-सट्टेबाजी प्रकरणी CBIची मोठी कारवाई, सात जणांविरोधात गुन्हा दाखल
मात्र शेवटच्या फळीतील फलंदाज अपयशी ठरल्यामुळे हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला.वॉशिंग्ट सुंदर (४), शशांक सिंग (११), मार्को जानसेन (१), भुवनेश्वर कुमार (६ नाबाद) उमरान मलिक (३ नाबाद) या खेळाडूंनी पुरती निराशा केली. परिणामी वीस षटके संपेपर्यत हैदराबाद संघ फक्त १२३ धावांपर्यंतच मजल मारु शकला आणि कोलकाता संघाने ५४ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
हेही वाचा >>> नाद करा पण आमचा कुठं! विराट कोहलीने रचला नवा विक्रम, IPLमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला एकमेव खेळाडू
यापूर्वी नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स संघाने सुरुवातीला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र केकेआरची सुरुवात खराब झाली. संघाच्या १७ धावा झालेल्या असताना अवघ्या सात धावांवर व्यंकटेश अय्यर बाद झाला. त्यांनतर दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या नितेश राणा (२६) आणि सलामीचा अजिंक्य रहाणे (२८) या जोडीने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा >>> काय पण नशीब! विराट कोहली कसा बाद झाला बघाल, तर तुम्ही पण हेच म्हणाल
तिसऱ्या विकेटसाठी आलेल्या श्रेयस अय्यरने खास कामगिरी केली नाही. १५ धावांवर असताना तो झेलबाद झाला. त्यानंतर सॅम बिलिंग्सने ३५ धावा करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केला. फिनिशर म्हणून नावारुपाला येत असलेला रिंकू सिंग मात्र आज खास कामगिरी करु शखला नाही. तो अवघ्या पाच धावांवर पायचित झाला. शेवटी आंद्रे रसेल आणि सुनिल नरेन या जोडीन नाबाद खेळी केली. रसेलने नाबाद ४९ धावा केल्या. २० षटके संपेपर्यंत कोलकाता संघाच्या १७७ धावा झाल्या.
हेही वाचा >>> क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडूचा विराटला मोलाचा सल्ला; म्हणाला “तू काय केलं होतं हे विसर, तुझं वय…”
फलंदाजी विभागात केकेआरच्या गोलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावली. आंद्रे रसेलने केन विल्यम्सन, वॉशिंग्टन सुंदर आणि मार्को जानसेन या आघाडीच्या फलंदाजांना तंबुत पाठवलं. तर टीम साऊथीने राहुल त्रिपाठी आणि शशांक सिंग यांचा बळी घेतला. या दोन्ही गोलंदाजांनी महत्त्वाच्या फलंदाजांना बाद केल्यामुळे केकेआरचा विजय सोपा झाला. उमेश यादव, सुनिल नरेन आणि वरुण चक्रवर्ती या तिघांनी प्रत्येकी एक बळी घेतला.