मुंबई आणि पुण्याच्या मैदानांवर येत्या २६ मार्चपासून आयपीएलचा थरार रंगणार आहे. यावेळी दहा संघ मैदानात उतरणार असून यांच्यात ट्रॉफी जिंकण्यासाठी तगडी सर्धा होणार आहे. दरम्यान, पाच वेळा ट्रॉफीवर नाव कोरणाऱ्या मुंबई इंडियन्सवर यावेळी सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. रोहित शर्मा सारथ्य करत असलेल्या या टीमध्ये काही नवे खेळाडू आले आहेत तर काही जुने खेळाडू या संघात कायम आहेत. त्यामुळे हा संघ यावेळी बहारदार कामगिरी करणार का याकडे सर्वांचेच लक्ष असेल.
२०१३ ते २०२० या कालावधित मुंबई इंडियन्सने तब्बल पाच वेळा आयपीएल क्रिकेट स्पर्धा जिंकलेली आहे. आतापर्यंत सर्वाधिक वेळा जेतेपद पटकावणाऱ्या संघांमध्ये मुंबई इंडियन्स नंबर एकची टीम आहे. त्यामुळे यावेळी हा संघ कसा खेळ करणार याची उत्सुकता सर्वांनाच लागलीय. मुंबई इंडियन्सने काही खेळाडूंना रिटेन केले आहे. तर इशान किशनसारख्या चांगल्या खेळाडूंचा संघात नव्याने समावेश केला आहे. तर दुसरीकडे क्विंटन डी कॉक, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या आणि ट्रेंट बोल्टसारखे दिग्गज खेळाडू यावेळी मुंबई इंडियन्स संघात सामील नसतील. त्यामुळे काही नवे खेळाडू संघात सामील झाल्यामुळे यावेळी मुंबई इंडियन्स संघ अंतिम फेरीपर्यंत मजल मारणार का ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
मुंबई इंडियन्स संघातील सर्व खेळाडू
रोहित शर्मा (कर्णधार), संजय यादव, जोफ्रा आर्चर, मुरगन अश्विन, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, किरन पोलार्ड, इशान किशन, देवाल्ड ब्रेविस, बसिल थंपी, जयदेव उनाडकट, राहुल बुद्धी, हृतिक शोकीन, अर्जुन तेंडुलकर, आर्यन जुयाल, फॅबियन अॅलन, मयंक मार्कंडे, एन तिलक वर्मा, संजय यादव, डॅनियल सॅम्स, टायमल मिल्स, टी. डेव्हिड, रिले मेरेडिथ, मोहम्मद अर्शद खान, अनमोलप्रीत सिंग, रमणदीप सिंग,
मुंबई इंडियन्स संघाचे बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), अनमोलप्रीत सिंग, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, किरन पोलार्ड, टिम डेव्हिड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, डॅनियल सॅम्स/फॅबियन ऍलन, एम अश्विन
फलंदाजीकडे लक्ष द्यावे लागेल
पाच वेळा जेतेपदाला गवसणी घातलेल्या मुंबई इंडियन्सकडे यावेळी रोहित शर्म, इशान किशन, सूर्यकुमार यादव तसेच जसप्रीत बुमराह यांच्यासारखे दिग्गज खेळाडू आहेत. कोणत्याही क्षणी सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता या खेळाडूंमध्ये आहे. या मोसमातही हे खेळाडू चांगली कामगिरी करतील अशी आशा मुंबई इंडियन्सला आहे. मात्र यावेळी मुंबई इंडियन्सकडे हार्दिक पंड्या तसेच क्विंटन डी कॉकसारखे फलंदाज नसतील. त्यामुळे रोहित शर्माला संघाच्या फलंदाजीकडे जास्त लक्ष्य द्यावे लागणार आहे. सूर्यकुमार यादवसारखा फलंदाज सध्या दुखापतीमुळे त्रस्त आहे.
गोलंदाजीमध्ये मुंबई इंडियन्सकडे जसप्रित बुमहार हा हुकुमी एक्का आहे. बुमहारसारख्या गोलंदाजाची विरोधी संघाला थोपवण्यासाठी मोठी मदत होणार आहे. बुमहारसोबत किरन पोलार्ड तसेच टीम डेव्हिड हेदेखील मुंबई इंडियन्ससोबत असणार आहेत.