आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ५३ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन तगड्या संघांमध्ये खेळवला जातोय. या सामन्याला सुरुवातीपासून रंगत चढली असून पहिल्याच षटकात कर्णधार विरुद्ध कर्णधार असा सामना पाहायला मिळाला. कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या डायरेक्ट हीटमुळे लखनऊचा कर्णधार केएल राहुल याला शून्यावर धावबाद व्हावं लागलंय.
हेही वाचा >>राजस्थान रॉयल्सचा सहा विकेट्स राखून दणदणीत विजय, पराभवामुळे पंजाबसाठी पुढची लढाई अवघड
नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लखनऊ संघाकडून क्विंटन डी कॉक आणि कर्णधार केएल राहुल सलामीला आले. ही जोडी मोठी धावसंख्या उभारेल अशी अपेक्षा होती. मात्र पहिल्याच षटकात लखनऊला मोठा धक्का बसला. सामन्याच्या पहिल्याच षटकात केएल राहुल धावबाद झाला.
हेही वाचा >> युझवेंद्र चहलने करुन दाखवलं! तीन विकेट्स घेत रचला अनोखा विक्रम, लसिथ मलिंगालाही टाकलं मागे
सामन्याचे पहिले षटक टाकण्यासाठी टीम साऊदीकडे चेंडू देण्यात आला. त्याने टाकलेल्या पाचव्या चेंडूला क्विंटन डी कॉकने हलक्या हाताने टोलवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चेंडू खूप दूर गेलेला नसतानाही क्विंटन आणि राहुल या जोडीने चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान चेंडू थेट श्रेयस अय्यरच्या हातात पोहोचल्यामुळे या दोघांचा गोंधळ उडाला. परिणामी धाव न घेण्याचे ठरवत राहुलने क्रिजकडे धाव घेतली. मात्र याच गोंधळात श्रेयस अय्यरने चेंडू थेट स्टंप्सवर मारला आणि केएल राहुलला धावबाद व्हावे लागले.
हेही वाचा >> अफलातून जोस बटलर! हवेत झेप घेत एका हाताने टिपला झेल, धवनला केलं बाद
दरम्यान, केएल राहुल शून्यावर बाद झाला असला तरी त्याच्यासोबत आलेल्या क्विटंन डी कॉकने धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने २९ चेंडूंमध्ये चार चौकार आणि तीन षटकार लगावत ५० धावा केल्या. तर दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या दीपक हुडीनेदेखील समाधानकारक खेळी करत २७ चेंडूंमध्ये ४१ धावा केल्या.