आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ५३ व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात लढत झाली. या सामन्यात लनखऊ सुपर जायंट्सचा ७५ धावांनी दणदणीत विजय झाला असून केकेआरचा पूर्ण संघ फक्त १०१ धावा करु शकला. गोलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावल्यामुळेच लखनऊला विजयाची गोडी चाखता आली. लखनऊने केकेआरसमोर विजयासाठी १७७ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
हेही वाचा >> युद्धस्थितीमुळे रशियाच्या ग्रँडमास्टर बुद्धिबळपटूंचा देशत्याग!
लखनऊने विजयासाठी दिलेल्या १७७ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाची चांगलीच धांदल उडाली. कोलकात्याचा आंद्रे रसेल वगळता एकही खेळाडू समाधानकार फलंदाजी करु शकला नाही. कोलकाता संघाचे फलंदाज ठराविक अंतरावर बाद होत गेले. सलामीला आलेला बाबा इंद्रजित शून्यावर झेलबाद झाला. तर दुसऱ्या विकेटसाठी आलेला श्रेयस अय्यरदेखील फक्त ६ धावा करुन तंबुत परतला. त्यानंतर मात्र कोलकाता संघाचे फलंदाज बाद होत गेले.
हेही वाचा >> ज्या जर्सीवर भारताविरोधात १० विकेट्स घेतल्या तिलाच काढलं विकायला; न्यूझीलंडच्या दिग्गज खेळाडूचा मोठा निर्णय
सलामीला आलेल्या अरॉन फिंचने फक्त १४ धावा केल्या. तर नितीश राणा (२), रिंकू सिंह (६) या दोघांनीही पुरती निराशा केली. रिंकू सिंह बाद झाल्यानंतर कोलकाता संघाची ६९ धावांवर पाच गडी बाद अशी दुर्दशा झाली. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या आंद्रे रसेल आणि सुनिल नरेन (२२) या जोडीने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघेही झेलबाद झाल्यानंतर केकेआरच्या विजयाच्या आशा मावळल्या.
हेही वाचा >> कॅप्टन विरुद्ध कॅप्टन! श्रेयस अय्यरच्या डायरेक्ट हीटमुळे लखनऊला मोठा झटका, केएल राहुल शून्यावर बाद
शेवटच्या फळीतील चार फलंदाज फक्त तीन धावा करु शकले. परिणामी कोलकाता नाईट रायडर्स संघाचा डाव १५ व्या षटकातच गुंडाळला. पूर्ण गडी बाद होईपर्यंत केकेआरला फक्त १०१ धावा करता आल्या.
हेही वाचा >> राजस्थान रॉयल्सचा सहा विकेट्स राखून दणदणीत विजय, पराभवामुळे पंजाबसाठी पुढची लढाई अवघड
यापूर्वी नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आल्यानंतर लखनऊची खराब सुरुवात झाली. सलामीला आलेला लखनऊचा कर्णधार केएल राहुल पहिल्याच षटकात धावबाद झाला. त्याला खातंदेखील उघडता आलं नाही. त्यानंतर मात्र दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या दीपक हुडा आणि क्विंटन डी कॉक या जोडीने धमाकेदार खेळी केली.
हेही वाचा >> युझवेंद्र चहलने करुन दाखवलं! तीन विकेट्स घेत रचला अनोखा विक्रम, लसिथ मलिंगालाही टाकलं मागे
क्विंटन डी कॉकने २९ चेंडूंमध्ये ५० धावांची अर्धशतकी खेळी केली. तर दीपक हुडानेदेखील २७ चेंडूंमध्ये ४१ धावा केल्या. मधल्या फळीतील फलंदाजांनीही समाधानकारक खेळी करत लखनऊचा धावफलक खेळता ठेवला. तिसऱ्या विकेटसाठी आलेल्या कृणाल पांड्याने २७ चेंडूंमध्ये २५ धावा केल्या. तर आयुष बदोनी (१५ नाबाद), मार्कस स्टॉईनीस (२८) जेसन होल्डर (१३) यांनी सामाधानकार खेळी करून लखनऊला १७६ धावांपर्यंत नेऊन ठेवलं.
हेही वाचा >> अफलातून जोस बटलर! हवेत झेप घेत एका हाताने टिपला झेल, धवनला केलं बाद
लखनऊच्या गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली. गोलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावल्यामुळेच केकेआरसारख्या संघाला १०१ धावांपर्यंत रोखता आलं. आवेश खानने नितीश राणा, आंद्रे रसेल आणि अनुकूल रॉय अशा दिग्गज फलंदाजांना तंबुत पाठवलं. तर जेसन होल्डरनेही सुनिल नरेन, टीम साऊदी, अरॉन फिंच या तिघांना बाद करत लखनऊचा विजय सोपा केला. मोहसीन खान, दुष्यमंथा छमिरा, रवी बिश्नोई या तिघांनी प्रत्येकी एक बळी घेत आवेश आणि जेसन यांना मदत केली.