आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ३७ वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या तगड्या संघांमध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आतापर्यंत मुंबई इंडियन्सचे सलग सात सामने गमावले आहेत. त्यामुळे या सामन्यात मुंबई विजयासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे. तर दुसरीकडे लखनऊ सुपर जायंट्स हा संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकवर आहे. या संघाने एकूण सातपैकी चार सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे. तर चार सामन्यांत या संघाला पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. त्यामुळे हा सामना जिंकून अव्वल चार संघांमध्ये स्थान मिळवण्यासाठी हा संघ धडपड करणार आहे.

Live Updates
23:34 (IST) 24 Apr 2022
मुंबई इंडियन्सला आठवा झटका, सॅम्स झेलबाद

मुंबई इंडियन्सला लगेच आठवा झटका बसला आहे. डॅनियल सॅम्स झेलबाद झाला आहे.

23:32 (IST) 24 Apr 2022
मुंबई इंडियन्सला सहावा मोठा झटका, किरॉन पोलार्ड झेलबाद

मुंबई इंडियन्सला सहावा मोठा झटका बसला आहे. किरॉन पोलार्ड १९ धावांवर झेलबाद झाला आहे.

23:21 (IST) 24 Apr 2022
मुुंबई इंडियन्सला पाचवा मोठा झटका, तिलक वर्मा झेलबाद

मुंबई इंडियन्सला पाचवा मोठा झटका बसला आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करताना तिलक वर्मा ३८ धावांवर झेलबाद झाला आहे.

22:40 (IST) 24 Apr 2022
मुंबई इंडियन्सला चौथा मोठा झटका, सूर्यकुमार यादव बाद

मुंबई इंडियन्सला सूर्यकुमार यादवच्या रुपात चौथा मोठा झटका बसला आहे. सूर्यकुमार यादव अवघ्या सात धावा करून तंबुत परतलाय.

22:31 (IST) 24 Apr 2022
मुंबई इंडियन्सला तिसरा मोठा झटका, रोहित शर्मा झेलबाद

मुंबई इंडियन्सला रोहित शर्माच्या रुपात तिसरा मोठा झटका बसला आहे. रोहित शर्मा ३९ धावा करुन तंबुत परतला आहे.

22:22 (IST) 24 Apr 2022
मुंबईला दुसरा मोठा झटका, ब्रेवीस तीन धावांवर झेलबाद

मुंंबई इंडियन्सला दुसरा मोठा झटका बसला आहे. देवाल्ड ब्रेविस अवघ्या तीन धावांवर झेलबाद झाला आहे. ब्रेविस स्वस्तात बाद झाल्यामुळे आता मुंबईवर दबाव वाढला आहे.

22:16 (IST) 24 Apr 2022
मुंबई इंडियन्सला पहिला मोठा झटका, इशान किशन झेलबाद

मुंबई इंडियन्सला इशान किशनच्या रुपात पहिला मोठा झटका बसला आहे. इशान किशन आठ धावाववर झेलबाद झाला आहे.

21:54 (IST) 24 Apr 2022
मुंबईपुढे १६९ धावांचे लक्ष्य, रोहित-इशान किशन फलंदाजीसाठी मैदानात

लखनऊ सुपर जायंट्सने १६८ धावा केल्या आहेत. तर मुंबई इंडियन्सला विजयासाठी १६९ धावांची गरज आहे. मुंबईकडून सध्या रोहित शर्मा आणि इशान किशन सलामीला आले आहेत.

21:21 (IST) 24 Apr 2022
लखनऊला सहावा मोठा झटका, आयुष बदोनी झेलबाद

लखनऊ सुपर जायंट्सला सहावा मोठा झटका बसला आहे. आयुष बदोनीच्या रुपात लखनऊचा सहावा फलंदाज बाद झाला आहे. आयुष बदोनीने १४ धावा केल्या आहेत.

21:19 (IST) 24 Apr 2022
केएल राहुल पुन्हा तळपला, झळकावले शतक

लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल पुन्हा एकदा तळपला आहे. त्याने ६५ चेंडूंमध्ये शतक झळकावले आहे. १२ चौकार आणि चार षटकार लगावत राहुलने ही कामगिरीक केलीय.

20:59 (IST) 24 Apr 2022
लखनऊला पाचवा मोठा झटका,दीपक हुडा झेलबाद

लखनऊला पाचवा मोठा झटका बसला आहे. दीपक हुडा अवघ्या दहा धावा करून झेलबाद झाला आहे.

20:46 (IST) 24 Apr 2022
लखनऊ सुपर जायंट्सला चौथा मोठा झटका, कृणाल पांड्या झेलबाद

लखनऊला चौथा मोठा झठका बसला आहे. कृणाल पांड्या अवघी एक धाव करून झेलबाद झाला आहे. सध्या लखनऊच्या २०५ धावा झाल्या आहेत.

20:43 (IST) 24 Apr 2022
लखनऊला तिसरा मोठा झटका, मार्कस स्टॉईनीस झेलबाद

लखनऊ सुपर जायंट्सला तिसरा मोठा झटका बसला आहे. लखनऊचा मार्कस स्टॉईनीस खातं न खोलताच झेलबाद झाला आहे.

20:33 (IST) 24 Apr 2022
लखनऊ सुपर जायंट्सला दुसरा झटका, मनिष पांडे झेलबाद

लखनऊ सपर जायंट्सला मनिष पांडेच्या रुपात दुसरा झटका बासला आहे. सध्या लखनऊच्या ८५ धावा झाल्या आहेत.

20:29 (IST) 24 Apr 2022
केएल राहुलने झळकावले अर्धशतक

केएल राहुलने अर्धशतक झळकावले आहे. त्याने ३७ चेंडूंमध्ये सहा चौकार आणि एक षटकार लगवात ५० धावा केल्या आहेत.

19:52 (IST) 24 Apr 2022
लखनऊ सुपर जायंट्सला पहिला झटका, क्विंटन डी कॉक झेलबाद

लखनऊ सुपर जायंट्सला क्विंटन डी कॉकच्या रुपात पहिला झटका बसला आहे. क्विंटन डी कॉक दहा धावांवर झेलबाद झालाय. सध्या लखनऊच्या २१ धावा झाल्या आहेत.

19:40 (IST) 24 Apr 2022
मुंबई इंडियन्सचा प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), देवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, हृतिक शोकीन, डॅनियल सॅम्स, जयदेव उनाडकट, रिले मेरेडिथ, जसप्रीत बुमराह

19:39 (IST) 24 Apr 2022
लखनऊ संघाचा प्लेइंग इलेव्हन

क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), केएल राहुल (कर्णधार), मनीष पांडे, कृणाल पांड्या, दीपक हुडा, आयुष बदोनी, मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, दुषमंथा छमिरा, रवी बिश्नोई, मोहसिन खान

19:36 (IST) 24 Apr 2022
सामन्याला सुरुवात, क्विंटन डी कॉक- केएल राहुल फलंदाजीसाठी मैदानात

मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्याला सुरुवात झाली आहे. लखनऊकडून क्विंटन डी कॉक आणि केएल राहुल फलंदाजीसाठी मैदानात उतरले आहेत.

19:17 (IST) 24 Apr 2022
नाणेफेक जिंकून मुंबईचा गोलंदाजी करण्याचा निर्णय

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता लखनऊ संघाला सुरुवातीला फलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागणार आहे.

18:12 (IST) 24 Apr 2022
टॉप चार संघांमध्ये सामील होण्यासाठी लखनऊ प्रयत्न करणार

लखनऊ सुपर जायंट्स आजचा सामना जिंकण्यासाठी पूर्ण ताकतीने प्रयत्न करणार आहे. आजचा सामना जिंकल्यानंतर लखनऊ संघ टॉप चार संघांमध्ये सामील होऊ शकतो. त्यामुळे आज विजय संपादन करण्यासाठी हा संघ धडपड करणार आहे.

18:10 (IST) 24 Apr 2022
आज मुंबईचा विजय होणार का?

मुंबई संघाने आतापर्यंत सलग सात सामने गमावले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात मुंबईचा विजय होणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

18:09 (IST) 24 Apr 2022
वानखेडे स्टेडियमवर रंगणार थरार

आज मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन संघांमध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सामना रंगणार आहे. सांयकाळी ७.३० वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे.

Story img Loader