रजत पटिदारच्या (५४ चेंडूंत नाबाद ११२) कारकीर्दीतील पहिल्या शतकामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने ‘आयपीएल’मधील एलिमिनेटर’मध्ये लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धचा सामना १४ धावांनी जिंकला. ईडन गार्डन्स येथे झालेल्या एलिमिनेटर सामन्यात पटिदारने आपल्या शतकी खेळीत १२ चौकार आणि सात षटकारांची आतषबाजी केली. त्याने विराट कोहलीसोबत (२५ धावा) दुसऱ्या गड्यासाठी ६६ धावांची आणि दिनेश कार्तिकसह (नाबाद ३७) पाचव्या गड्यासाठी ६.५ षटकांत ९२ धावांची अभेद्य भागिदारी रचली.

नक्की पाहा >> शिखर धवनला वडिलांकडून मारहाण, आधी कानाखाली मारली मग लाथा बुक्क्यांनी मारहाण केली; Viral झाला घरातील ‘तो’ Video

पटिदार आणि कार्तिकने हाणामारीच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी केली. त्यामुळे बंगळूरुने अखेरच्या पाच षटकांत ८४ धावा केल्या. पटिदार यंदाच्या ‘आयपीएल’ हंगामात शतक झळकावणारा चौथा फलंदाज ठरला आहे. आपल्या या कामगिरीबद्दल सामन्यानंतर बोलताना पाटिदारने पहिल्या सह चेंडूंनंतर आपण मोठी खेळी खेळू शकतो असा विश्वास वाटल्याचं म्हटलंय.

नक्की पाहा >> LSG vs RCB: विराटला बाद केल्यानंतर आवेश खाननं केलेली ‘ती’ कृती चर्चेत; Viral Video वरुन दोन गट, पाहा नेमकं घडलं काय

पटिदारला सामनावीर हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्या. पुरस्कार मिळाल्यानंतर बोलताना पाटिदारने, “मैदानात उतरल्यानंतर पहिल्या षटकामध्ये चांगली फटकेबाजी केल्यानंतर आज मी मोठी खेळी खेळू शकतो असं वाटू लागलं. मी पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकामध्ये क्रुणाल पांड्याच्या षटकामध्ये एक षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने २० धावा केल्या. त्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला,” असं सांगितलं. लखनऊच्या खेळाडूंनी पाटिदारचे दोन ते तीन झेल सोडले. याचाही पाटिदारने चांगला फायदा घेत मोठी धावसंख्या रचण्यात संघाला मदत केली.

नक्की वाचा >> हेटमायरच्या पत्नीबद्दल सुनिल गावस्करांचं वादग्रस्त वक्तव्य; RR vs CSK सामन्यात कॉमेन्ट्रीदरम्यान म्हणाले, “मोठा प्रश्न हा आहे की…”

मी मोठे फटके खेळू शकतो आणि ती क्षमता माझ्यात आहे. त्यामुळेच मी जेव्हा निर्धाव चेंडू खेळायला घाबरलो नाही. निर्धाव चेंडूंची मला भीती वाटत नाह. त्यामुळे माझ्यावर मानसिक ताण येत नाही. लिलावामध्ये आधी बोली लागली नव्हती यावर बोलताना पाटिदारने हे माझ्या हातात नाहीय, असं सांगितलं. लिलावामध्ये अनसोल्ड राहिल्यानंतर मी माझ्या खेळावर लक्ष केंद्रित केलं. आरसीबीने पाटिदारला लिलावामध्ये विकत घेतलं नव्हतं. लवनीथ सिसोदियाला दुखापत झाल्यानंतर २० लाख रुपयांना आरसीबीने पाटिदारला संघात घेतलं. पाटिदार हा आयपीएलच्या इतिहासामध्ये प्लेऑफच्या सामन्यात शतक ठोकणारा पहिला अनकॅप्ट खेळाडू ठरलाय.

नक्की वाचा >> IPL: सलग दुसऱ्या वर्षी अर्जूनला मुंबईच्या संघात स्थान न मिळाल्याबद्दल सचिन स्पष्टच बोलला; म्हणाला, “मला याबद्दल…”

पाटिदारने ५४ चेंडूंमध्ये २०७ च्या स्ट्राइक रेटने नाबाद ११२ धावा कुटल्या. दुसरीकडे लखनऊचा कर्णधार के. एल. राहुल पाटिदारपेक्षा चार चेंडू अधिक खेळला. म्हणजेच त्याने ५८ चेंडूंमध्ये ७९ धावा खेळल्या. म्हणजेच पाटिदारपेक्षा चार चेंडू अधिक खेळूनही राहुलने त्याच्यापेक्षा ३३ धावा कमी केल्या होत्या. सामन्याचा निकाल केवळ १४ धावांनी लागला. आरसीबीचा जलदगती गोलंदाज हर्षल पटेल हा दुखापतग्रस्त असतानाच त्याने भन्नाट गोलंदाजी केली. त्याने चार षटकांमध्ये केवळ २५ धावा दिल्या आणि एका गड्याला बाद केलं.

Story img Loader