आयपीएलच्या १५ व्या हंगामातील सर्वच लढती रंगतदार होत आहेत. सर्वच संघ विजयासाठी कसोसीने प्रयत्न करताना दिसतायत. आज लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात लढत होणार असून आज मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजता हा सामना रंगणार आहे. आज समोरासमोर येणाऱ्या दोन्ही संघांनी आपले पहिले सामने गमावले आहेत. त्यामुळे आजचा सामना खिशात घालण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील असतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यात अष्टपैलू खेळाडू मोईन अली सामील झाला आहे. त्यामुळे चेन्नईला बळ मिळाले आहे. मोईन पहिला सामना खेळू शकला नव्हता. आता या सामन्यात तो चांगली कामगिरी करेल अशी आशा आहे. तर दुसरीकडे पहिल्या सामन्यात चेन्नईच्या खेळाडूंनी खराब कामगिरी केली. चेन्नईला फक्त १३१ धावा करता आल्या होत्या. कोलकताविरोधात झालेल्या या सामन्यात ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉन्वे लगेच बाद झाले. ऋतुराज शून्य तर कॉन्वे अवघ्या ३ धावा करुन तंबूत परतला होता. दरम्यान आजच्या सामन्यात ही जोडी चांगला खेळ करेल अशी आशा आहे. तर दुसरीकडे मधल्या फळीतील उथप्पा, नायडू आणि रविंद्र जाडेजासह धोनी यांच्यावरही संघाची मोठी जबाबदारी असेल.

तर दुसरीकडे लखनऊ सुपर जायंट्सनेही आपला पहिला सामना गमावला असून आज विजय संपादन करण्याचे त्यांच्यासमोर मोठे आव्हान असेल. याआधीच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने निराशाजनक कामिगीर केली होती. तो पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला होता. त्याचबरोबर सलामीला फलंदाजी करणारा क्विंटन डी कॉकदेखील फक्त सात धावा करुन बाद झाला होता. त्यामुळे या जोडीवरही आजच्या सामन्यात चांगला खेळ करण्याची जबाबदारी असेल. तर मधल्या फळीतील लुई, मनिष पांडे यांच्यावर संघाची भिस्त असून त्यांना या सामन्यात चकमदावर कामगिरी कावी लागणार आहे. छमीरा, कृणाल पांड्या यांनाही चेन्नईला रोखण्यासाठी गोलंदाजीमध्ये सातत्या ठेवावे लागणार आहे.

लखनऊ सुपर जायंट्सचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

केएल राहुल (कर्णधार), एविन लुईस, क्विंटन डी कॉक (य़ष्टीरक्षक), मनीष पांडे, दीपक हुडा, क्रुणाल पांड्या, मोहसिन खान, आयुष बडोनी, दुष्मंथा चमीरा, रवी बिश्नोई, आवेश खान

कोलकाता नाईट रायडर्सचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायुडू, रविंद्र जाडेजा (कर्णधार), एमएस धोनी (यष्टीरक्षक), ड्वेन ब्राव्हो, मिचेल सँटनर, तुषार देशपांडे, अॅडम मिल्ने

सामना कोठे आणि किती वाजता सुरु होणार ?

आजचा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर सायंकाळी ७.३० वाजता सुरु होईल.

सामना कोठे पाहता येईल ?

आजचा सामना disney+ hotstar तसेच हा सामना स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्यांवर) पाहता येईल.तसेच या सामन्याचे सर्व अपडेट तुम्हाला loksatta.com या लोकसत्ताच्या ऑफिशियल वेसबाईटवरही भेटतील.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 lucknow super giants and chennai super kings match today know playing 11 prd