मुंबईने दिलेल्या १५६ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरताच चेन्नई संघाला पहिल्याच चेंडूवर मोठा फटका बसला. सलामीला आलेला ऋतुराज गायकवाड शून्यावर झेलबाद झाला. त्यानंतर चेन्नईचे खेळाडू ठराविक अंतरावर बाद होत गेले. सलामीला आलेल्या उथप्पाने ३० धावा केल्या. तर मिचेल सँनटरने ११ धावा करुन संघाला लक्ष्यापर्यंत जाण्यास मदत केली.
चेन्नई सुपर किंग्जला सातवा मोठा झटका बसला आहे. ड्वेन प्रिटोरिअस २२ धावांवर पायचित झाला आहे. चेन्नईला पाच चेंडूंमध्ये १७ धावांची गरज आहे.
चेन्नई सुपर किंग्जला सहावा मोठा झटका बसला असून रविंद्र जाडेजा अवघ्या तीन धावा करून झेलबाद झाला आहे. सध्या चेन्नईच्या १०६ धावा झाल्या आहेत.
चेन्नई सुपर किंग्जला पाचवा मोठा झटका बसला आहे. अंबाती रायडू ४० धावांवर झेलबाद झाला असून किरॉन पोलार्डने त्याचा झेल टिपला आहे.
चेन्नई सुपर किंग्जला शिवम दुबेच्या रुपात चौथा मोठा झटका बसला आहे. शिवम १३ धावा करुन तंबुत परतला आहे. सध्या चेन्नईच्या ८८ धावा झाल्या असून ४२ चेंडूंमध्ये ६८ धावांची गरज आहे.
चेन्नई सुपर किंग्जला रॉबिन उथप्पाच्या रुपात दिसरा मोठा झटका बसला आहे. उथप्पा ३० धावांवर झेलबाद झाला आहे. सध्या चेन्नईच्या ६६ धावा झाल्या आहेत.
चेन्नई सुपर किंग्जला दुसरा मोठा झटका बसला आहे. मिचेल सँटनरने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तो झेलबाद झाला.
मुंबई इंडियन्सने २० षटकांत १५५ धावा केल्या आहेत. तर जिंकण्यासाठी १५६ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नईला पहिलाच झटका बसला आहे. चेन्नईचा ऋतुराज गायकवाड शून्यावर बाद झाला आहे.
मुंबई कठीण काळातून जात असताना तिलक वर्माने धडाकेबाज खेळी केली आहे. त्याचे अर्धशतक पूर्ण झाले असून मुंबईच्या १३७ धावा झाल्या आहेत.
मुंबई इंडियन्सला डॅनियल सॅम्सच्या रुपात सातवा मोठा झटका बसला आहे. डिजे ब्राव्होने टाकलेल्या चेंडूवर तो पायचित झालाय. सध्या मुंबईच्या १२१ धावा झाल्या आहेत.
मुंबई इंडियन्सला किरॉन पोलार्डच्या रुपात सहावा मोठा झटका बसला आहे. मुंबई इंडियन्सच्या सध्या १११ धावा झाल्या आहेत. किरॉन पोलर्ड हा खेळाडू मुंबई इंडियन्सची मोठी आशा होती. मात्र तो अवघ्या १४ धावा करुन झेलबाद झाला आहे.
मुंबई इंडियन्सला पाचवा मोठा झटका बसला आहे. हृतिक शोकीन २५ धावांवर झेलबाद झाला आहे. हृतिक बाद झाल्यानंतर मुंबईच्या ८९ धावा झाल्या आहेत.
मुंबई इंडियन्सला चौथा मोठा झटका बसला आहे. सूर्यकुमार यादवच्या रुपात मुंबईला हा धक्का बसला आहे. सूर्यकुमारने ३२ धावा केल्या. सध्या मुंबईच्या ४७ धावा झाल्या असून चार गडी बाद झाले आहेत.
मुंबई इंडियन्सला देवाल्ड ब्रेविसच्या रुपात तिसरा मोठा झटका बसला आहे. सध्या मुंबईच्या २३ धावा झालेल्या आहेत. फक्त २३ धावा असताना मुंबईचे तीन गडी बाद झाले आहेत.
मुंबई इंडियन्सला पहिल्याच षटकात दुसरा मोठा झटका बसला आहे. सलामिला आलेला इशान किशन शून्यावर त्रिफळाचित झाला आहे.
मुंबई इंडियन्सला पहिल्याच षटकात रोहित शर्माच्या रुपात पहिला मोठा झटका बसला आहे. रोहित शर्मा शून्यावर झेलबाद झाला आहे.
चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून सुरुवातील गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईला या हंगामात अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे आजची लढत मुंबईसाठी करो या मरो अशी असणार आहे. तर दुसरीकडे चेन्नई संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर असून चेन्नईलादेखील आजचा सामना जिंकणे गरजेचे असणार आहे. विजयावर नाव कोरण्यासाठी दोन्ही संघ पूर्ण ताकतीने प्रयत्न करणार आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा संघ मैदानाकडे निघाला आहे.
मुंबई इंडियन्स संघ डीवाय पाटील स्पोर्ट अकॅडमी स्टेडियमकडे निघाला आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ डीवाय पाटील स्पोर्ट अकॅडमी स्टेडियमकडे रवाना झाला आहे.