आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ३३ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन तूल्यबळ संघांमध्ये लढत होत आहे. मात्र सुरुवातीला आलेल्या मुंबईची सुरुवात अतिशय खराब झाली आहे. मुंबईचे सलामीला आलेले रोहित शर्मा आणि इशान किशन हे आघाडीचे खेळाडू शून्यावर बाद झाले आहेत.

हेही वाचा >>> अर्जुन तेंडुलकरची भन्नाट गोलंदाजी, नेट प्रॅक्टिस करताना केलं क्लीन बोल्ड, पाहा व्हिडीओ

आजचा सामना म्हणजे मुंबईसाठी करो या मरो आहे. असे असताना पहिल्याच षटकात मुंबईचे सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झाले आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही खेळाडू शून्यावरच तंबुत परतले आहेत. सामन्याचा पहिल्याच षटकात दुसरा चेंडू खेळताना रोहित शर्मा झेलबाद झाला. तर याच षटकात पाचवा चेंडू खेळताना इशान शर्मा त्रिफळाचित झाला. या दिग्गज फंलदाजांना तंबुत पाठवण्याचे काम चेन्नईचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने केले आहे.

हेही वाचा >>>विश्लेषण: आयपीएलमध्ये करोना नियम काय आहेत? किती खेळाडूंसोबत संघ मैदानात उतरु शकतो?

सलामीचे दोन्ही फलंदाज शून्यावर बाद झाल्यामुळे मुंबईवर नामुष्की ओढवली आहे. विशेष म्हणजे रोहित शर्मा यापूर्वी आयपीएलमध्ये १३ वेळा शून्यावर बाद झालेला होता. शून्यावर तंबुत परतण्याची त्याची ही १४ वी वेळ आहे.

Story img Loader