शनिवारी (२१) झालेला दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. हा सामना म्हणजे दिल्ली कॅपिटल्ससाठी ‘करो या मरो’ असाच होता. मात्र मुंईने पाच गडी राखून दिल्लीवर विजय मिळवला. विशेष म्हणजे मुंबईच्या विजयामुळेच रॉयल चॅलेंजर्स बंगळरु संघाला प्लेऑफमध्ये पोहोचता आले. बंगळुरुचे भवितव्य मुंबईच्या विजयावर अवलंबून होते. याच पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर वेगवेगळे मीम्स व्हायरल होत आहेत.
हेही वाचा >> DRS का घेतला नाही? खुद्द ऋषभ पंतने सांगितलं कारण; दुसऱ्यांवर फोडलं अपयशाचं खापर
शनिवारी झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्स संघाचा पराभव किंवा विजय यावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे भवितव्य अवलंबून होते. या सामन्यात दिल्ली संघांचा विजय झाला असता तर या संघाने बंगळुरु संघाशी बरोबरी साधली असती. तसेच रनरेट जास्त असल्यामुळे दिल्ली संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळाला असता. तर दुसरीकडे बंगळुरु संघाचे आव्हान संपुष्टात आले असते. मात्र या सामन्यात मुंबई इंडियन्सचा विजय झाल्यामुळे दिल्ली संघ प्लेऑफच्या शर्यतीतून आपोआपच बाद झाला आणि बंगळुरु संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळाले.
हेही वाचा >> प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी बंगळुरुच्या खेळाडूंनी हे काय केलं? MI vs DC सामन्यात मुंबईच्या विजयासाठी…
मुंबईच्या विजयामुळे बंगळुरु संघ प्लेऑफमध्ये पोहोचला. त्यामुळे खालील मीम्स व्हायरल झाले.