आयपीएलचे पंधरावे पर्व आता शेवटच्या टप्प्यात आहे. या हंगामातील मोजकेच साखळी सामने शिल्लक राहिले असून प्लेऑफच्या सामन्यांचा थरार अनुभवण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. असे असताना आज दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होत आहे. आजचा विजय दिल्ली कॅपिटल्ससाठी अनिवार्य आहे. तसेच मुंबईचा विजय बंगळुरु संघासाठी गरजेचा आहे. त्यामुळे आजचा सामना चांगलाच अटीतटीचा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >> ४, ४, ६, ४… मोईन अली तळपला! चेन्नईच्या शेवटच्या सामन्यात केली धडाकेबाज खेळी
गुणातालिकेचा विचार करायचा झाला तर दिल्ली कॅपिट्लस हा संघ पाचव्या स्थानी आहे. प्लेऑफमध्ये स्थान पक्के करायचे असेल तर दिल्ली कॅपिटल्सला आजचा विजय गरजेचा असेल. तसेच आजच्या सामन्यात दिल्लीचा पराभव झाला तर बंगळुरु संघ प्लेऑफमध्ये जाईल. त्यामुळे आजच्या सामन्यात विजयी कामगिरी करण्यासाठी दिल्ली संघ पूर्ण ताकतीने प्रयत्न करणार आहे.
हेही वाचा >> महेंद्रसिंह धोनी आयपीएलच्या पुढच्या पर्वात खेळणार का ? निवृत्तीबद्दल माहीने स्पष्टच सांगितले, म्हणाला…
दिल्ली संघाची भिस्त डेव्डिड वॉर्नर, ऋषभ पंत, ललित यादव या आघाडीच्या फलंदाजांवर असेल. तसेच कुलदीप यादव आणि खलिल अहमद यांच्यासारखे गोलंदाज मुंबईला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतील. तर दुसरीकडे इशान किशन, रोहित शर्मा, तिलक वर्मा अशी फलंदाजांची मोठी फळी मुंबई संघाकडे आहे. तसेच जसप्रित बुमराह आणि मयंक आर्कंडेय या गोलंदाजांना दिल्लीला तोंड द्यावे लागणार आहे.
हेही वाचा >> ड्रेसिंग रुममध्ये त्रागा करणं भोवलं, आयपीएलने मॅथ्यू वेडवर केली ‘ही’ कारवाई
मुंबई इंडियन्स संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन: इशान किशन, रोहित शर्मा (कर्णधार), डॅनियल सॅम्स, तिलक वर्मा, रमणदीप सिंग, त्रिस्टॅन स्टब्स, टिम डेव्हिड, संजय यादव, जसप्रित बुमराह, रिले मेरेडिथ, मयंक मार्कंडेय
हेही वाचा >> दिग्गज अभिनेता आमिर खानने केली अजब मागणी, म्हणतो IPL मध्ये संधी मिळेल का? रवी शास्त्रींनीही दिलं भन्नाट उत्तर
दिल्ली कॅपिटल्स संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन: डेव्हिड वॉर्नर, सरफराज खान, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार), ललित यादव, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद