IPL 2022, KKR vs MI Highlights :आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील १४ वा सामना आज मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवला जात आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळवला जातोय. कोलकाता नाईट राडयर्स संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. तर मुंबई इंडियन्स पिछाडीवर असून हा संघ आठव्या स्थानावर आहे. त्यामळे कोलकाता प्रथम स्थान गाठण्यासाठी तर मुंबई आणखी वर येण्यासाठी प्रयत्न करत आहेत
कोलकाता नाईट रायडर्सचा पाच गडी राखून दणदणीत विजय झाला असून पॅट कमिन्स आणि व्यंकटेश अय्यर या विजयाचे शिलेदार ठऱले आहेत.
कोलकात संघाच्या आतापर्यंत ११५ धावा झाल्या असून कोलकाताने पाच गडी गमावले आहेत. अजूनही कोलकाताला ३६ चेंडूंमध्ये ४६ धावांची गरज आहे.
कोलकाता नाईट रायडर्सला आंद्रे रसेलच्या रुपात पाचवा मोठा धक्का बसला आहे. रसेल फक्त ११ धावा करुन झेलबाद झाला आहे. रसेलनंतर आता पॅट कमिन्स फलंदाजीसाठी आला आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघाचे फलंदाज ठऱाविक अंतरावर बाद होत आहेत. सध्या कोलकाताला नितीश राणाच्या रुपात चौथा झटका बसला असून तो अवघ्या आठ धावा करून तंबुत परतला आहे.
कोलकाता संघाला सॅम बिलिंग्सच्या रुपात तिसरा झटका बसला आहे. बिलिंग्स १७ धावांवर झेलबाद झाला आहे.
कोलकाता नाईट रायडर्सला दुसरा मोठा झटका बसला आहे. कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर अवघ्या दहा धावांवर झेलबाद झाला आहे.
कोलकाता नाईट रायडर्सला पहिला मोठा झटका बसला आहे. अजिंक्य रहाणे सात धावांवर झेलबाद झाला आहे.
मुंबईचा डाव संपला असून मुंबईने वीस षटकांत १६१ धावा केल्या आहेत. तर कोलकातासमोर मुंबईने १६२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
मुंबईला सूर्यकुमार यादवच्या रुपात चौथा मोठा झटका बसला आहे. सूर्यकुमारने अर्धशतकी खेळ केला असून तो ५२ धावांवर झेलबाद झाला आहे.
मुंबईचा फलंदाज सूर्यकुमार यादवने मैदानावर आपले पाय रोवले असून त्याने अर्धशतक झळकाले आहे. त्याच्या या अर्धशतकानंतर मुंबई संघाच्या १३८ धावा झाल्या आहेत.
मुंबई इंडियन्सच्या १०० धावा झाल्या आहेत. १६ षटकांत मुंबईने ही धावसंख्या गाठली असून सध्या मैदानात सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा ही जोडी फलंदाजी करत आहे.
मुंबईला इशान किशनच्या रुपात तिसरा मोठा झटका बसला आहे. इशान झेलबाद झाला असून त्याने २१ चेंडूंमध्ये १४ धावा केल्या आहेत. इशान बाद झाल्यानंतर आता तिलक वर्मा फलंदाजीसाठी आला आहे.
मुंबई इंडियन्सला दुसरा मोठा धक्का बसला असून ब्रेविस यष्टीचित झाला आहे. ब्रेविसने २९ धावा केल्या आहेत. ब्रेविस बाद झाल्यानंतर आता सूर्यकुमार यादव फलंदाजीसाठी आला आहे.
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर आता डेवाल्ड ब्रेविस फलंदाजीसाठी आला आहे. इशान किशन आणि ब्रेविस ही जोडी मोठे फटके मारताना दिसत आहे. सध्या मुंबईच्या ३७ धावा झाल्या आहेत.
मुंबईला पहिला झटका बसला असून कर्णधार रोहित शर्मा फक्त तीन धावा करुन झेलबाद झाला आहे.
अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, सॅम बिलिंग्ज (यष्टीरक्षक), आंद्रे रसेल, सुनील नरेन, पॅट कमिन्स, शिवम मावी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, जयदेव उनाडकट
आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाणार असून या सामन्याला संध्याकाळी ७.३० वाजता सुरुवात होणार आहे.