IPL 2022 MI vs LSG Highlights : इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा २६ वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला गेला. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र या सामन्यात मुंबईचा १८ धावांनी पराभव झाला असून हा मुंबईचा सलग सहावा पराभव आहे.
लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स या सामन्यामध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा १८ धावांनी पराभव झाला आहे. तर दुसरीकडे मुंबईचा या हंगामातील हा सलग सहावा पराभव आहे.
मुंबई इंडियन्सला सहावा मोठा झटका बसला आहे. फॅबियन ऍलन अवघ्या आठ धावांवर झेलबाद झालाय.
मुंबई इंडियला सूर्यकुमा यादवच्या रुपात पाचवा झटका बसला आहे. सूर्यकुमार यादवने २७ चेंडूंमध्ये ३७ धावा केल्या. मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्न करताना तो झेलबाद झाला.
मुंबई इंडियन्स संघ सध्या अडचणीत सापडला आहे. मुंबईला तिलक वर्माच्या रुपात चौथा झटका बसला असून त्याने २६ चेंडूंमध्ये २६ धावा केल्या आहेत. सध्या मुंबईला ३१ चेंडूमध्ये ७६ धावा करायच्या आहेत.
मुंबई इंडियन्सने शंभर धावा पूर्ण केल्या आहेत. सध्या मुंबईच्या १०४ धावा झाल्या असून सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा ही जोडी फलंदाजी करत आहे.
मुंबई इंडियन्सला इशान किशनच्या रुपात तिसरा मोठा झटका बसला आहे. इशन किशन १३ धावांवर त्रिफळाचित झाला आहे.
मुंबई इंडियन्सला दुसरा मोठा झटका बसला आहे. देवाल्ड ब्रेविस ३१ धावा करुन झेलबाद झालाय.
मुंबई इंडियन्सला दुसरा मोठा झटका बसला आहे. देवाल्ड ब्रेविस ३१ धावा करुन झेलबाद झाला आहे. सध्या मुंबईच्या ५७ धावा झाल्या आहेत.
मुंबई इंडियन्सचे फलंदाज मैदानात उतरले आहेत. मात्र मुंबईला सुरुवातीलाच मोठा झटका बसला आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा अवघ्या सहा धावांवर झेलबाद झाला आहे.
केएल राहुलने दमदार शतकी खेळ केला असून त्याच्या फलंदाजीच्या जोरावरच लखनऊने १९९ धावा केल्या आहेत. तर सामना जिंकण्यासाठी मुंबईला २०० धावा कराव्या लागणार आहेत.
लखनऊ सुपर जायंट्सला चौथा झटका बसला आहे. दीपक हुडा १५ धावांवर झेलबाद झाला आहे.
लखनऊ सुपर जायंट्स संघाच्या सध्या १९५ धावा झाल्या आहेत. तर लखनऊचा कर्णधार केएल राहुलाने दमदार शतक झळकावले आहे. राहुलने ५७ चेंडूंमध्ये शतक झळकावले आहे.
लखनऊ सुपर जायंट्स संघाच्या सध्या १७३ धावा झाल्या आहेत. सध्या केएल राहुल आणि दीपक हुडा फलंदाजी करत असून राहुलच्या ९२ धावा झाल्या आहेत.
लखनऊ सुपर जायंट्स हा संघ सध्या मजबूत स्थितीत आहे. मात्र या संघाला आता तिसरा झटका बसला असून मार्कस स्टॉइनिस दहा धावांवर झेलबाद झाला आहे. सध्या लखनऊच्या १५७ धावा झाल्या आहेत.
लखनऊ सुपर जायंट्सला मनिष पांडेच्या रुपात दुसरा मोठा झटका बसला आहे. सध्या लखनऊ संघाच्या १३० धावा झाल्या आहेत. तर केएल राहुल अजूनही मैदानात टिकून असून त्याच्या ६० धावा झाल्या आहेत.
केएल राहुल सध्या धमाकेदार फलंदाजी करत आहे. त्याचे अर्धशतक पूर्ण झाले असून ३५ चेंडूंमध्ये त्याने ५१ धावा केल्या आहेत.
लखनऊ सुपर जायंट्सने दमदार सुरुवात केली आहे. लखनऊच्या एकूण १०० धावा झाल्या असून फक्त एक गडी बाद झालेला आहे. तर दुसरीकडे मुंबई अजूनही दुसऱ्या विकेटच्या शोधात आहे.
लखनऊ सुपर जायंट्सने सुरुवात चांगली केली आहे. सध्या लखनऊच्या ८४ धावा झालेल्या आहेत. तर लखनऊने आतापर्यंत फक्त एका गड्याला गमावलं आहे.
लखनऊ सुपर जायंट्सला पहिला झटका बसला आहे. लखनऊचा क्विंटन डी कॉक २४ धावांवर पायचित झाला आहे.
लखनऊ सुपर जायंट्स: केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मनीष पांडे, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, आयुष बडोनी, जेसन होल्डर, कृणाल पंड्या, दुष्मंथा चमिरा, आवेश खान, रवी बिश्नोई.
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, किरॉन पोलार्ड, फॅबियन ऍलन, जयदेव उनाडकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स.
हंगामातील पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या मुंबई इंडियन्स संघापुढे शनिवारी ‘आयपीएल’मध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाचे आव्हान आहे. मुंबईच्या संघाला यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच सलग पाच सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे.