आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील २६ व्या सामन्यातील लढत चांगलीच रंगतदार झाली. या सामन्यामध्ये लखनऊ सुपर जायंट्सने १८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. तर पाच वेळा जेतेपेपदाचा मान मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सला सलग सहाव्या पराभवाला तोंड द्यावे लागले. लखनऊ सुपर जायंट्सने दिलेले २०० धावांचे लक्ष्य गाठताना मुंबईचा संघ १८१ धावा करु शकला. केएल राहुलने शतकी भागिदारी केल्यामुळे लखनऊचा विजय सोपा झाला.

हेही वाचा >>> IPL 2022 : मुंबई विरोधात झळकावले दमदार शतक, पण सेलिब्रेशन करताना केएल राहुल कान का बंद करतो ?

२०० धावांचे लक्ष्य गाठताना मुंबईचे फलंदाज मैदानावर जास्त काळासाठी तग धरू शकले नाहीत. सलामीवीर इशान किशन आणि रोहित शर्मा मोठी खेळी करु शकले नाहीत. सुरुवातीला रोहित शर्मा अवघ्या सहा धावांवर तर इशान किशन १३ धावांवर झेलबाद झाला. देवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र देवाल्ड ब्रेविस आवेश खानच्या चेंडूवर ३१ धावांवर झेलबाद झाला.

हेही वाचा >>> राहुल त्रिपाठीच्या षटकारांच्या पावसानंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पूर

सूर्यकुमार यादव ३७ धावा करुन रवी बिश्नोईच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर तिलक वर्मा आणि किरॉन पोलार्ड या फलंदाजांनी २०० धावांचे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र लखनऊच्या गोलंदाजांनी त्यांना अवघ्या २६ आणि २५ धावांवर तंबूत पाठवलं. त्यानंतर मात्र मुंबईच्या विजयाची आशा मावळली. जयदेव उनाडटकटने १४ धावा केल्या. तर फॅबियन आलेन (८), मुरुगन अश्विन (६) या शेवटच्या फळीतील फलंदाजांनीही निराशा केली.

हेही वाचा >>> IPL 2022 SRH vs KKR : आंद्रे रसेलचे शेवटच्या ओव्हरमध्ये दोन षटकार, ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस

याआधी सुरुवातीला फलंदाजीसाठी आलेल्या लखनऊने जोरदार फटकेबाजी करत मुंबईसमोर १९९ धावांचा डोंगर उभा केला. सलामीला आलेल्या राहुल चहरने १०३ धावांची नाबाद खेळी केली. त्याने ६० चेंडूंमध्ये पाच षटकार आणि ९ चौकार यांच्या मदतीने नाबाद १०३ धावा केल्या. त्यानंतर क्विंटन डी कॉक आणि मनिष पांडे यांनी राहुलला साथ देत अणुक्रमे २४ आणि ३८ धावा केल्या. तर मार्कस स्टिओनीस आणि दीपक हुडा यांनी दहा आणि पंधरा धावा केल्यामुळे लखनऊचा संघ १९९ धावसंख्येपर्यंत पोहोचू शकला.

हेही वाचा >>> IPL 2022 : हार्दिक पांड्याचा अफलातून डायरेक्ट हीट! चेंडू मारताच तुटला स्टंप, संजूला ‘असं’ केलं बाद

मुंबईचे गोलंदाज लखनऊच्या फलंदाजांना रोखू शकले नाहीत. लखनऊ संघ ५२ धावांवर असताना क्विंटन डी कॉकच्या रुपात पहिली विकेट मिळाल्यामुळे मुंबईच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र मुंबई संघ लखनऊचे एकूण चार गडी बाद करू शकला. जयदेव उनाडकटने दोन बळी घेतले. तर मुरुगन अश्विन आणि फॅबियन एॅलेन यांनी प्रत्येकी एक बळी घेतले.

हेही वाचा >>> मुंबईचा सलग ५ सामन्यांमध्ये पराभव, IPLच्या इतिहासात असं आणखी कोणत्या संघांसोबत घडलं?

तर दुसरीकडे लखनऊच्या गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांना सुरुवातीपासून बांधून ठेवले. मुंबईच्या सोळा धावा झालेल्या असतानाच रोहित शर्मा बाद झाला आणि येथूनच मुंबई संघ ढासळला. आवेश खानने चांगली कामगिरी करत तीन बळी घेतले. तर जेसन होल्डर, छमिरा, रवी बिश्नोई, मार्कस स्टिओनिस यांनी प्रत्येक एक बळी घेतला.

Story img Loader