IPL 2022, MI vs PBKS Highlights : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील २३ व्या सामन्याला सुरुवात झाली आहे. आजचा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज या दोन संघांमध्ये खेळवला जात असून मुंबई इंडियन्स आपल्या पहिल्या विजयासाठी पूर्ण ताकतीने मैदानात उतरला आहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईसमोर सध्या १९९ धावांचे लक्ष्य आहे.
मुंबई इंडियन्सला सातवा मोठा झटका बसला असून जयदेव उनाडकट १२ धावांवर झेलबाद झाला आहे. सध्या मुंबईला तीन चेंडूंमध्ये १४ धावांची गरज आहे.
मुंबई इंडियन्सला सूर्यकुमार यादवच्या रुपात सहावा मोठा झटका बसला आहे. सूर्यकुमार यादवने ३० चेंडूंमध्ये ४३ धावा केल्या. सध्या मुंबईला विजयासाठी ८ चेंडूंमध्ये २२ धावांची गरज आहे.
मुंबई इंडियन्सला पाचवा मोठा झटका बसला आहे. किरॉन पोलर्ड धावबाद झाल्यामुळे त्याला अवघ्या दहा धावांवर तंबुत परतावंल लागलं आहे. सध्या मुंबई संघ १५२ धावांवर आहे.
मुंबई इंडियन्सला तिसरा मोठा झटका बसला असून देवाल्ड ब्रेविस ४९ धावांवर झेलबाद झाला आहे. सध्या मुंबईच्या ११६ धावा झाल्या आहेत.
देवाल्ड ब्रेविस तुफानी फलंदाजी करत असून तो पंजाबच्या गोलंदाजांना झोडपून काढत आहे. त्याने राहुल चहरच्या षटकात २८ धावा केल्या आहेत. ब्रेविसने सलग चार षटकार लगावले आहेत.
मुंबईला दुसरा मोठा धक्का बसला असून इशान किशन अवघ्या तीन धावा करुन बाद झाला आहे. मुंबईसाठी हा मोठा झटका असल्याचे म्हटले जात आहे.
मुंबईला पहिला मोठा झटका बसला असून रोहित शर्मा २८ धावांवर झेलबाद झाला आहे. सध्या मुंबईच्या ३१ धावा झाल्या आहेत.
पंजाब किंग्जने वीस षटकांत १९८ धावा केल्या आहेत. पाच गडी गमावून पंजाबने ही धावसंख्या उभारली आहे. शिखर धवन आणि मयंक अग्रवालने अर्धशतक झळकावल्यामुळे पंजाबला ही धावसंख्या गाठता आली.
पंजाब किंग्जला पाचवा मोठा झटका बसला असून शाहरुख खान त्रिफळाचित झाला आहे. शाहरुखने १५ धावा केल्या.
पंजाचे फलंदाज मोठे फटके लगावत असून सध्या पंजाबच्या १७८ धावा झाल्या आहेत. सध्या जितेश शर्मा आणि शाहरुख खान फलंदाजी करत आहेत.
पंजाब किंग्जला शिखर धवनच्या रुपात चौथा मोठा झटका बसला आहे. शिखर धवन ७० धावांवर झेलबाद झाला आहे. पंजाबच्या सध्या १५१ धावा झाल्या आहेत.
पंजाब किग्जला तिसरा मोठा झटका बसला आहे. लियाम लिव्हिंगस्टोन फक्त दोन धावांवर त्रिफळाचित झाला आहे. बुमराहच्या चेंडूचा सामना करताना तो बाद झाला आहे.
पंजाब किंग्जला दुसरा मोठा झटका बसला आहे. जॉनी बेअरस्टो फक्त बारा धावा करुन तंबुत परतला आहे. उनाडकटच्या चेंडूचा सामना करताना बेअरस्टो त्रिफळाचित झाला.
पंजाबचा सलामीवीर शिखर धवनने अर्धशतक झळकावले असून त्याने ५० धावा केल्या आहेत. सध्या पंजाबच्या १६७ धावा झालेल्या आहेत.
पंजाब किंग्जला मयंक अग्रवालच्या रुपात पहिला झटका बसला असून मयंक ५२ धावांवर खेळत असताना मुरुगन अश्विनच्या चेंडूवर झेलबाद झाला. सूर्यकुमार यादवने हा झेल टिपला
पंजाब किंग्जचे सलामीवीर शिखर धवन आणि मयंक अग्रवाल मैदानावर चांगलेच सेट झाले आहे. या दोघांनीही चौकार आणि षटकार लगावत आतापर्यंत ८० धावा केल्य आहेत. आठ षटके संपली असून अजून मुंबईला एकही बळी मिळालेला नाही.
मयंक अग्रवाल आणि शिखर धवन तुफान फटकेबाजी करत असून पंजबाच्या ६० धावा झाल्या आहेत. सध्या पाच षटके पूर्ण झेलेले असले तरी मुंबईला एकही बळी मिळेलाला नाहीये. मुंबई अजूनही पहिल्या विकेटच्या शोधात आहे.
पंजाबच्या सध्या ३४ धावा झाल्या असून शिखर धवन आणि मयंक अग्रवाल फलंदाजी करत आहेत. मुंबईला सध्या पहिल्या विकेटचा शोध आहे.
मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, ओडियन स्मिथ, शाहरुख खान, कागिसो रबाडा, राहुल चहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंग
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), देवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, जयदेव उनाडकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थंपी
नाणेफेक जिंकून मुंबईने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पंजाबचे शिखर धवन आणि मयंक अग्रवाल हे फलंदाज सलामीला आले आहेत.