मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएल २०२२ मध्ये आतापर्यंच चांगली कामगिरी करु शकलेला नाही. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात पाच चेंडू खेळल्यानंतर रोहित शर्मा अवघ्या दोन धावांवर बाद झाला. रोहित शर्माच्या रूपाने मुंबईने पहिली विकेट गमावली आहे. डावातील तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर आर अश्विनने रोहितला डॅरिल मिशेलकरवी झेलबाद केले. रोहित आऊट झाला तेव्हा मुंबईची धावसंख्या २३ धावा होती.
राजस्थान रॉयल्सने जोस बटलरच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर १५९ धावांचे लक्ष मुंबई इंडियन्ससमोर ठेवले आहे. या लक्षाचा पाठलाग करताना, मुंबई इंडियन्सने सामन्याच्या तिसऱ्या षटकात रोहित बाद झाला. आर अश्विनने रोहिलतला बाद केले. यावेळी रोहित शर्मा आणि आर अश्विन दोघांच्या पत्नी स्टॅंडमध्ये उपस्थित होत्या.
रोहितच्या सर्व चाहत्यांना माहीत आहे की तो फलंदाजी करत असताना त्याची पत्नी रितिका किती उत्कट, भावूक आणि भावनिक होते. सामन्यादरम्यान रोहितची विकेट गेल्यानंतर रितीका नाराज झाल्याचे पाहायला मिळाले.
रोहित आऊट झाल्यावर ती खूप भावूक झाली होती. यावेळी लगेचच अश्विनची पत्नी प्रिती रितिकाकडे गेली आणि पाठिंबा देण्यासाठी तिला एक मिठी मारली. दोघांमधील मैदानाबाहेरील हा एक सुंदर क्षण होता. यानंतर याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रोहित शर्माने त्याच्या वाढदिवसाला पत्नी रितिकासमोर खेळण्यासाठी उतरला होता. पण राजस्थान रॉयल्सविरुद्ध तो स्वीप मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. आर अश्विनच्या विरोधात त्याने काही चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. त्यानंतर त्याने हवेत मारण्याचा विचार केला, पण चेंडू हवेत गेला आणि बाद झाला.