आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील नववा सामना चांगलाच आटीतटीचा ठरला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सलने मुंबई इंडियन्सला धूळ चारली. राजस्थानचा २३ धावांनी विजय झाला. राजस्थानच्या गोलंदाजांनी मुंबईला रोखण्यासाठी मोठी मेहनत घेतली. इशान किशनला बाद करण्यासाठी तर नवदीप सैनीने जीवाचे रान केले. झेल टिपताना सैनी जखमी झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इशानला बाद करताना सैनी जखमी कसा झाला ?

राजस्थान रॉयल्सने दिलेले १९४ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मुंबईचे इशान किशन आणि तिलक वर्मा धडाकेबाज फलंदाजी करत होते. दोघांनीही आपला जम बसवला होता. त्यामुळे ही जोडी तोडणे राजस्थानला गरजेचे होऊन बसले होते. इशान किशन ५४ धावांवर असताना त्याने ट्रेन्ट बोल्टने टाकलेल्या चेंडूवर मोठा फटका लगावला. या चेंडूमुळे इशान किशनला चार धावा मिळणार होत्या. मात्र चेंडू हवेत असताना नवदीप सैनी जीवाचे रान करत पूर्ण ताकतीनशी धावला. झेल टिपण्यासाठी त्याने स्वत:ला झोकून दिले आणि शेवटी चेंडू हवेत पकडला. यामुळे सैनी मैदानावर जोरात आदळला. त्यामुळे डोक्याला मार लागल्यामुळे तो जखमी झाला.

दरम्यान, मैदानावर पडल्यामुळे जखमी झालेला असूनही सैनीने हातातील चेंडू सोडला नाही. परिणामी इशान किशनला ५४ धावांवर तंबुत परतावे लागले. इशान बाद झाल्यामुळे सामना राजस्थानकडे झुकला आणि शेवटी राजस्थान रॉयल्सचा विजय झाला.